vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर,निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज- अपर जिल्हाधिकारी अडकुणे

स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर,निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज- अपर जिल्हाधिकारी अडकुणे

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून गुरुवार दि.१८ जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी करण्यात येत असून प्रशासन सज्ज आहे,अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज जिल्हाप्रशासनाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर उपस्थित होते. पत्रकार परिषदेत प्रथम निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे-

निवडणूक अधिसुचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोमवार दि.२५ मे २०२६, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक सोमवार दि.१ जून २०२६, नामनिर्देशन पत्राची छाननी मंगळवार दि.२ जून २०२६, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि.४ जून २०२६, मतदानाचा दिनांक गुरुवार दि.१८ जून २०२६, मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायं.४ वा. पर्यंत.  मतमोजणीचा दिनांक सोमवार दि.२२ जून २०२६. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक गुरुवार दि.२५ जून २०२६.

अपर जिल्हाधिकारी अडकुणे यांनी सांगितले की, या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर व जिल्हाधिकारी जालना हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर निवासी उपजिल्हाधिकारी हे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी असतील. यानिवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेले व नियुक्त सभासद हे मतदान करु शकतील. त्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांचा समावेश असेल. याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, मुख्याधिकारी यांच्याकडून मतदारांची यादी प्राप्त होईल. ही यादी अंतिम झाल्यावर त्यावर हरकती मागविण्यात येतील. त्यानंतर मतदार यादी अंतिम करण्यात येईल. निवडणुक आचार संहिता लागू झालेली असून आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत,असेही त्यांनी सांगितले.

००००००

संबंधित पोस्ट

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा* *4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली* 

मुद्देमाल हस्तांतरणातून नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास दृढ- विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा- चार कोटींचा मुद्देमाल हस्तांतरीत- 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदी परत- 283 मोबाईल, 24500 किलो बेदाण्याचा समावेश

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले – अपर मुख्य सचिव विकास खारगे

vishwatmaklokswamivarta

जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ

जालना जिल्ह्यात ‘विपश्यना केंद्रा’ सह बहुउद्देशीय सुविधा उभारणीला गती द्यावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्याकामकाजाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा..