vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

16 कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित ; जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांची कारवाई नियमाचे उल्लंघन केल्याचे उघड 

16 कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित ; जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांची कारवाई नियमाचे उल्लंघन केल्याचे उघड

 

नांदेड प्रतिनिधी:- खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 16 कृषी सेवाकेंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी शुक्रवारी (ता. 17) झालेल्या सुनावणीनंतर ही कारवाई केली.

 

जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत अनेक घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांकडे गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यांचे खुलासे असमाधान‌कारक आढळल्याने व नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

तपासणीत ई-पॉस प्रणालीतील अनियमितता, कंपनीकडून मिळालेल्या ‘Acknowledgement’ ची वेळेत नोंद न करणे, तसेच ई-पॉस साठ्यात तफावत आढळली. याशिवाय दुकानांमध्ये भाव फलक व साठा फलक अद्ययावत नसणे, दैनंदिन अभिलेख न ठेवणे, नोंदवही व बिलांमधील त्रुटी, ‘एन’ फॉर्मनुसार साठा रजिस्टर न ठेवणे, तसेच शेतकऱ्यांना ‘एम’ फॉर्मनुसार पावत्या न देणे आणि खरेदी बिलांवर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसणे, काही कृषि सेवा केन्द्रात 20 पेक्षा जास्त रासायनिक खताच्या बॅगचे वितरण एकाच शेतकऱ्यांना करणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आले. या त्रुटी प्रकरणी संबंधित केंद्र चालकांना नोटिसा बजावून प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली. मात्र त्यांचे खुलासे असमाधानकारक आढळल्याने व नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची विक्री किंवा जादा दराने विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. नियमभंग करणाऱ्या केंद्रांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असे सांगीतले आहे.

 

शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन* अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत.* खरेदीचे पक्के बिल आवर्जून घ्यावे.* खते खरेदी करताना ‘फार्मर आयडी’ चा वापर करावा.* फसवणूक किंवा नियमभंग आढळल्यास कृषि अधिकारी (गुनि) तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

निलंबित कृषि सेवा केंद्र* ज्ञानेश्वर कृषि सेवा केंद्र बिलोली,* गजानन ॲग्रो एजन्सी हदगाव,* धनश्री ट्रेडिंग कंपनी कंधार,* न्यु श्रध्दा कृषि सेवा केंद्र पेठवडज ता.कंधार* माऊली कृषि सेवा केंद्र जांब ता.मुखेड,* श्रीराम कृषि सेवा केंद्र बाऱ्हाळी ता.मुखेड,* तिरुपती ट्रेडर्स,माळकौठा ता.मुदखेड.* कैलास कृषि सेवा केंद्र मुक्रमाबाद ता.मुखेड* ज्ञानेश्वरी कृषि सेवा केंद्र मुखेड,* शिल्पा कृषि सेवा केंद्र हिमायतनगर,* समृध्दी बीज भांडार हिमायतनगर,* बालाजी फर्टीलायझर्स कारेगाव, ता.धर्माबाद.* व्यंकटेश कृषि सेवा केंद्र करडखेड, ता.देगलूर. * सचिन कृषि सेवा केंद्र,माळेगाव, ता.देगलूर.* श्री साई कृषि सेवा केंद्र घुंगराळा,ता.नायगाव.* व्यंकटेश्वरा कृषि सेवा केंद्र बारुळ, ता.कंधार.

000000

संबंधित पोस्ट

महिला सक्षमीकरण अभियान; महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा    ‘विधवा’नव्हे ‘पुर्णांगिनी’म्हणा- रुपाली चाकणकर…

vishwatmaklokswamivarta

मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर- आस्थापनेने मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू कोरोना पुन्हा एकदा सक्रीय होत असल्याची चिन्हं दिसताच मुंबई महानर पालिका अलर्ट…

सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार; कागदपत्रे सादर करण्याचे अकोट वन्यजीव विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न !

उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी भागाचे नंदनवन – जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाचा ब्रेकथ्रू .प्रकल्पातील दोन लाईनचे काम पूर्ण- ⁠दुष्काळी जत तालुक्यासाठी जीवनदायी