vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निवडणूक प्रक्रियेतील माध्यमांसाठी जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धतींवर निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

निवडणूक प्रक्रियेतील माध्यमांसाठी जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धतींवर निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नवी दिल्ली प्रतिनिधी-भारत निवडणूक आयोगाच्या वतीने नवी दिल्लीतील भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेत (IIIDEM – India International Institute of Democracy and Election Management) आज आणि उद्या म्हणजे 4 जून 2026 रोजी ‘निवडणूक प्रक्रिया आणि मोहिमांधील माध्यमांसाठीच्या जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धती आणि नवोन्मेषी उपक्रम या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

आज या परिषदेच्या पहिल्या दिवशी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उपस्थितांना संबोधित केले. भारत निवडणूक आयोग 100 कोटींहून अधिक मतदारांशी अविरत संपर्काची सुनिश्चिती करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रतिनिधी यांच्यासह तळागाळातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. नुकत्याच पार पडलेल्या काही राज्यांच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमधील मतदारांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च सहभागातून निवडणूक प्रक्रियेवरील त्यांचा विश्वास दिसून आला, असेही त्यांनी नमूद केले.

या परिषदेमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी , निवडणूक नोंदणी अधिकारी, विषयतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि निवडणूक साक्षरता मंडळाच्या सदस्यांसह 480 पेक्षा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषदेमध्ये, 23 जानेवारी 2026 रोजी स्वीकारण्यात आलेल्या दिल्ली जाहिरनाम्याअंतर्गत प्रस्तावित अंतिम अहवालात योगदान देण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित केली गेली आहे. निवडणूक व्यवस्थापनाच्या विविध पैलूंशी संबंधित आंतरराष्ट्रीय अनुभव, आदर्श मानके आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींचे दस्तऐवजीकरण करणारी तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी जागतिक ज्ञान संसाधने विकसित करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे

या परिषदेतील चर्चा या प्रामुख्याने माध्यम जगतातील मोहिमांमधील महत्त्वाच्या आव्हानांवर केंद्रित आहेत. याअंतर्गत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगाने तयार केलेले डीपफेक साहित्य, सिंथेटिक मीडिया, पारदर्शकतेचा अभाव असलेल्या डिजिटल राजकीय जाहिराती आणि समाज माध्यम व्यासपीठांचे नियमन यांसारख्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स (International IDEA) या संस्थेचे 2026 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्याअंतर्गतच या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले आहे.

 

संबंधित पोस्ट

वनविभागापुढील आव्हानांचा यशस्वीपणे सामना करून वनसंपदेचे रक्षण करा – प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या दुसऱ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधणे व नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प -मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री-नितेश राणे

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज स्विकारण्यास दि.26 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

आंबिया बहार फळपीक विमा मंजूर: 3 हजार 910 शेतकऱ्यांच्याखात्यात लवकरच जमा होणार नुकसान भरपाई

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घेतली मंत्रालयात सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta

श्री सेवागिरी प्रदर्शनात कृषि विभागाचा स्टॉल ठरतोय आकर्षण*