vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस राज्यभरात नियुक्त्या, प्रदेश अध्यक्ष तानाजी घाग यांची माहिती

*श्रीमती सोनिया ब्रिगेड एक झंजावात!, सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस राज्यभरात नियुक्त्या **नियुक्ती झाल्याच्या एक महिन्याच्या कालावधीत संपुर्ण महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील 36 जिल्हे 353 तालुके सर्वत्र अध्यक्षाच्या मार्गदर्शनाने  नियुक्त्या केल्या जात आहेत

श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस या किंग्रेसी विचारधारेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी श्री.तानाजी घाग यांची नियुक्ती झाल्याच्या एक महिन्याच्या कालावधीत संपुर्ण महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील 36 जिल्हे 353 तालुके आणि 42030 गावाचा डेटा जमा करून मुंबई,ठाणे,पुणे,सांगली,सातारा,

कोल्हापूर,नाशिक,रायगड जिल्ह्यातील वरिष्ठ काँग्रेसी कार्यकर्ते आणि जेष्ठ समाजसेवकांशी चर्चा करून उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष,धहर अध्यक्षांच्या नियुक्त्यांचा आढावा, भिवंडी शहरातील जेष्ठ काँग्रेसी,उद्योगपती श्री.परवेज खान यांच्या उपस्थितीत भिवंडी शहर अध्यक्ष पदी श्री.शहजादे आलम खान यांच्या सह उपाध्यक्ष पदी मनोहर कदम,परवेज खान तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष पदी श्री.मंदार चांदोरकर यांची नियुक्ती करण्यात आली.सोशल डिस्टनसिंग चे पालन करून आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ठाणे,कल्याण,डोंबिवली,रातगड.कर्जत सह भिवंडीमधील अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात उपस्थिती लावली.

सोनिया ब्रिगेड च्या या धुआधार झंजावातास प्रतिसाद देताना श्री.परवेज खान यांनी सोनिया ब्रिगेड च्या माध्यमातून आम्हा काँग्रेसी कार्यकर्त्यांमध्ये श्री.घागसाहेब यांनी नवचैतन्य आणले असून, सोनिया ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्याची गवाही दिली.यावेळी सोनिया ब्रिगेड च्या महिला अध्यक्षा श्रीमती रिना खांडेकर यांनी 2024 मध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकहाती सत्ता घेण्यासाठी महिला ब्रिगेड सज्ज असेल अशी गवाही दिली.

सध्या देशातील राजकीय पर्यावरण प्रदूषित असून ज्याप्रमाणे स्वातंत्रसैनिकांनी फिरंगी साम्राज्याविरुद्ध उठाव करून सायमन गो ब्याक चा नारा लावला होता,तालागळातून कार्यकर्त्यांनी उठाव केला होता. येत्या काळात महाराष्ट्रात, महाराष्ट प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सहकार्य, आशीर्वादाने आणि काँग्रेसी विचारधारेनेच यापुढे सोनिया ब्रिगेड चे येत्या काळात 36 जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेबांच्या आदेशाने रणनीती ठरवितीलव ती अमलात आणण्याचे काम सोनिया ब्रिगेड करेल.व 2024 मध्ये काळ्या चामडीच्या इंग्रजाना हद्दपार करून 137 वर्षाच्या परंपरेच्या काँग्रेसचे संयमी नेतृत्व श्रीमान राहुल गांधी यांना पंतप्रधान पदी नियुक्त होईस्तोवर ही चळवळ उभारली जाईल असे परखड मत श्री तानाजी घाग यांनी व्यक्त केले.

श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान इरफान अहमद त्यागी यांनी या झंजावातास शुभेच्छा दिल्या असून लवकरच ते महाराष्ट्रात दौराआयोजित करतील असा कार्यकर्त्यांना शब्द दिला आहे.

संबंधित पोस्ट

एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह  –जिल्हाधिकारी किशन जावळे

टोलमाफीसंबंधी नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा….

बृहन्मुंबई शहरामध्ये हद्दीत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील मुंबादेवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तिसर्‍यांदा शपथ घेण्यापूर्वी घेतले दर्शन…

vishwatmaklokswamivarta

काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

पर्यटकांसाठी सूचना-“देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट”या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी…