सांगली, प्रतिनिधी: भारतीय डाक विभागाची विभागीय स्तरावरील सहामाही पेंशन अदालत दि. 6 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, अशा वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारींचे 3 महिन्यांच्या आत निवारण झालेले नसेल तर अशा प्रकरणांचा या पेंशन अदालत मध्ये विचार केला जाणार आहे. पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टीबीओपी /एमएसीपी पदोन्नती वेतन श्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डीपीसी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारक विहित नमुन्यातील अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर सांगली विभाग, यांचे कार्यालय, सांगली प्रधान डाकघर इमारत, राजवाडा चौक, सांगली -416416 यांच्या नावे दि. 2 जुलै 2026 रोजी किंवा तत्पूर्वी वैयक्तिक रूपाने पाठवू शकतात. दिनांक 2 जुलै नंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नसल्याचे प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले आहे.