vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऊर्जा विभागाने वीजनिर्मिती व खर्चाबाबत योग्य नियोजन केल्यास ग्राहकांना माफक दरात वीज वितरण शक्य होणार असल्याचे सांगत सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऊर्जा विभागाने वीजनिर्मिती व खर्चाबाबत योग्य नियोजन केल्यास ग्राहकांना माफक दरात वीज वितरण शक्य होणार असल्याचे सांगत सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे ऊर्जा विभागाची आढावा बैठक घेतली. #ऊर्जा विभागाने #वीजनिर्मिती व खर्चाबाबत योग्य नियोजन केल्यास ग्राहकांना माफक दरात वीज #वितरण शक्य होणार असल्याचे सांगत सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाला दिले.

ऊर्जा विभागाला सन २०२५-२६ या वर्षासाठी लागणारा निधी, विविध विभागांची वीज देयके #थकबाकी, #अनुदान वितरणाची सद्यस्थिती, विविध योजनांसाठी केलेली निधीची तरतूद, मेडामार्फत करण्यात आलेली कार्यवाही याचा आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला.

राज्यातील वीज वितरण व्यवस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक तेथे नियमांनुसार बदल करावेत. थकबाकी वेळेत वसुल होण्यासाठी कार्यवाही करावी. महावितरणला मंजूर झालेला आर्थिक वर्षाचा निधी आणि तूट याची तफावत वाढू नये, याची खबरदारी घ्यावी. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’, ‘पीएम कुसुम योजना’ प्रभावीपणे राबविण्यासाठी निधीची आवश्यकता असून ऊर्जा विभागाने सादर केलेली मागणी वित्त विभागाने विचारात घ्यावी. सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा मिळेल असे दर ठरविण्यासाठी योग्य त्या उपाययोजनाही करणे आवश्यक आहे – मुख्यमंत्री

या बैठकीला अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला मिळणार चालना जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम मतदारांच्या सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष व संपर्क क्रमांकांची घोषणा

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्ह्यातील ११ गावांचा समावेश; १५ जून पासून जनजागृती

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक!*कुंभमेळ्यात सनातन धर्म सोप्या भाषेत समजून घेण्याची भाविकांना अनमोल संधी !*सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कृति प्रदर्शन’ आयोजन !*

vishwatmaklokswamivarta

राहुरी पोटनिवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालींचे प्रशिक्षण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल