vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ : प्रतीक्षाधीन यादीतील तिसऱ्या फेरीस प्रारंभ

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ : प्रतीक्षाधीन यादीतील तिसऱ्या फेरीस प्रारंभ

 

ठाणे, प्रतिनिधी : शिक्षण हक्क कायदा (RTE) २००९ अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी प्रतीक्षाधीन यादीतील (Waiting List) तिसऱ्या फेरीस दि. २४ जून, २०२६ ते ०३ जुलै, २०२६ पर्यंत कालावधी देण्यात आला आहेआरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रतीक्षाधीन यादीतील (Waiting List) दुसऱ्या फेरीत २८१ विद्यार्थींचे प्रवेश करण्यात आले असून एकूण ९ हजार २१५ विद्यार्थींचे प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार आणि शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दुसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षाधीन यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तिसरी फेरी सुरू करण्यात आली आहे.

या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरटीई प्रवेश पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार निश्चित कालावधीत संबंधित शाळेत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. मुदतीत प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित जागा पुढील पात्र विद्यार्थ्यास उपलब्ध करून दिली जाईल.

पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, निवासाचा पुरावा, जन्मनोंद प्रमाणपत्र, आधार कार्ड तसेच शासनाने निर्देशित केलेली इतर कागदपत्रे तयार ठेवावीत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग अथवा आरटीई हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.

आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश असून, पात्र पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे

“शिक्षणाचा अधिकार प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी समाजातील वंचित व दुर्बल घटकांपर्यंत पोहोचत आहे. प्रतीक्षाधीन यादीतील तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

अवैध सावकारांकडील 74 हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत 55 प्रकरणांत गुन्हे दाखल 651 प्रकरणांची चौकशी पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन..

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन- २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

🎓 शिक्षणाची स्वप्ने साकार करण्यासाठी आर्थिक मदतीची सुवर्णसंधी!

मुंबई काँग्रेसचे महासचिव श्री तुषार एकनाथराव गायकवाड यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन