vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

*श्री तुळजाभवानीदेवीच्या ४ हजार एकर जमीन महाघोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश !* – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्याला यश…

*श्री तुळजाभवानीदेवीच्या ४ हजार एकर जमीन महाघोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश !* – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्याला यश…

 

 राज्य प्रतिनिधी *मुंबई* – लाखो हिंदू भाविकांचे कुलदैवत असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या ४ हजार १२१ एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीच्या अनधिकृतपणे हस्तांतरण आणि विक्री प्रकरणाची आता राज्य शासनामार्फत चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिलेल्या सविस्तर निवेदनाची गंभीर दखल घेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशीवच्या जिल्हाधिकार्‍यांना या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवीला १ सहस्र ६६६.१४ हेक्टर म्हणजेच सुमारे ४ हजार १२१.१४ एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही आणि याला ‘कुळ कायदा’ देखील लागू होत नाही. असे असतानाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आल्याचा आरोप आहे.

 श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री ३ हजार ३९७ एकर भूमी असतांना प्रत्यक्ष ताबा मात्र चार मठांमधील खाजगी व्यक्तीकडे आहे, तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करून ६३.०३ एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली, तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत २६१ एकर जमीन तब्बल ७३ खाजगी व्यक्तींच्या नावे ७/१२ वर नोंदवली. याशिवाय अपसिंगा आणि उफळा या गावांमधील १५८ एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आली आहे.*या प्रकरणातील सर्व संबंधितांवर तातडीने गुन्हे नोंद व्हावेत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ*

या प्रकरणात बेकायदेशीर हस्तांतरणात सामील असलेले तत्कालीन उपजिल्हाधिकारी, विश्‍वस्त आणि संबंधित मोठ्या लोकांवर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, अशी महासंघाची मागणी आहे. शासनाने विशेष अधिकारांचा वापर करून सर्व अनधिकृत खरेदीखते आणि ७/१२ वरील नोंदी तत्काळ रद्द कराव्यात आणि पूर्ण १ हजार ६६६.१४ हेक्टर जमीन पुन्हा श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रत्यक्ष नियंत्रणात घ्यावी, अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत.श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक,

मंदिर महासंघ, (संपर्क : ७०२०३८३२६४)

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न-खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी — रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

नद्या या भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद “एक भारत, श्रेष्ठ भारत” संकल्पना अधिक दृढ करावी

एमएचटी-सीईटी-परिक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ मधील तरतूदी लागू..

पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे : पालकमंत्री जयकुमार रावल जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर ! अतिवृष्टीबाधीत भागांची केली पाहणी आपत्तीग्रस्त भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करा गावकऱ्यांनी पंचनामे पूर्ण करुन घ्यावे  पंचनाम्याचे चावडी वाचन करा

vishwatmaklokswamivarta

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सुचना जारी..