vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दापोली, खेड, मंडणगडमधील प्रलंबित ऊर्जा कामांना गती द्या – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

दापोली, खेड, मंडणगडमधील प्रलंबित ऊर्जा कामांना गती द्या – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यांतील वीज वितरण, पायाभूत सुविधा आणि प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे करावीत असे निर्देया ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.दापोली येथील उपकेंद्राच्या जागेसाठी सकारात्मक प्रस्ताव पाठवा – राज्यमंत्री योगेश कदम

दापोली येथील उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. यासाठसकारात्मक प्रस्ताव पाठवावा. तसेच समुद्र किनाऱ्या जवळील जुन्या वीज वाहक लाईन रस्त्यालगत घेण्याबाबत राज्यमंत्री योगेश कदम यांनी सूचित केले.यावेळी ऊर्जा राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यांतील ऊर्जा विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस गृह राज्यमंत्री योगेश कदम, महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढीकर संचालक डी. व्ही. पडळकर, सतीश चव्हाण, कोकण विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक जगदाळे, मुख्य अभियंता डोळे आणि कावळे यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, दापोली, खेड, मंडणगड तालुक्यात वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेली कामे, नवीन उपकेंद्रे, उच्च व लघुदाब वीजवाहिन्यांची उभारणी, रोहित्रांची उपलब्धता, कृषी व घरगुती वीज जोडण्यांशी संबंधित प्रकरणे तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेल्या विविध मागण्या संवेदनशीलतेने हाताळून ही कामे विनाविलंब पूर्ण करावीत.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, या भागात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यावर तातडीने उपाययोजना कराव्या. आवश्यक तेथे कव्हर कंडक्टर लावण्याची कार्यवाही करावी. नागरिकांना सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास राज्य शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 100 विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय..

सुरक्षा मंत्रालायची पत्रकार परिषद,कमोडोर रघु आर नायर, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांची भारत-पाकिस्तान संघर्षविराम करारानंतर पत्रकार परिषद 

vishwatmaklokswamivarta

मजबुत संघटन बांधणी करुन नव्या जोमाने कामाला लागा- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे

महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta