vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

आईस्क्रिम म्हणून फ्रोझन डेझर्टचा वापर;ज्युस सेंटरवर कारवाई

आईस्क्रिम म्हणून फ्रोझन डेझर्टचा वापर;ज्युस सेंटरवर कारवाई

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आईस्क्रिम मधून फ्रोझन डेझर्टया प्रतिबंधित पदार्थाचा वापर आणि ज्युस साठी मुदतबाह्यसाठ्याचा वापर करणाऱ्या ज्युस सेंटर्सवर गुरुवारी (दि.२) अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने कारवाई केली.

गुरुवारी (दि.२) रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वर्षा रोडे, प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी व कीर्तिका झाडे यांच्या पथकाने पैठण गेट परिसरातील मे. लकी ज्युस सेंटर, मे.फ्रेश ज्युस सेंटर, मे.न्यू लकी ज्युस सेंटर येथे अचानक जाऊन तपासणीकेली. या ठिकाणी पास्चुराइज्ड होमोजनाइज्ड टोनड दूध व अल्फान्सो मैंगो पल्प या अन्नपदार्थ चा मुदतबाह्य साठा ज्यूस तयार करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच आईस्क्रीम म्हणून फ्रोझन डेझर्टचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.या दुकानांवर कारवाई करण्यात आली असून ‎परवाने निलंबीत करण्यात आले आहेत, तसेच जप्त केलेले साठे नष्ट करण्यात आले आहेत,असे सह आयुक्त अन्न श्रीकांत करकळे यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

माटुंगा येथे जय हिंद कॉलेजच्या २० वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक मधून मोठी बातमी -,इगतपुरीतील भावली धबधब्यावर पर्यटकांवर हल्ला; त्या महिलेची छेडछाड,करून त्यांनी केला गाडीचा पाठलाग करणाऱ्या नऊ आरोपींना अटक

नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्बप्रकरणी1044 वाहनधारकांना साडेचार लाख रुपये दंडाची आकारणी वायुवेग पथकाची वर्षभरातील कारवाई

मुदतबाह्य तुपाचा २ लाख ८९ हजारांचा साठा जप्त;अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई

पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर गंभीर प्रकार

रियान होल्डिंग प्रा.लि. आणि लॉयन्स हिल्स इस्टेट कंपनीत गुंतवणूक प्रकरणी फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखाकडे संपर्क करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta