vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नद्यांमधील गाळ काढल्याने पूरपातळी नियंत्रित राहण्यास झाली मदत**वर्षानुवर्षे भेडसावणारी पूराची दहशत आली संपुष्टात*

*नद्यांमधील गाळ काढल्याने पूरपातळी नियंत्रित राहण्यास झाली मदत**वर्षानुवर्षे भेडसावणारी पूराची दहशत आली संपुष्टात*

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: रायगड जिल्ह्यामध्ये सावित्री, काळ, पाताळगंगा, अंबा आदी महत्वाच्या नद्या वाहतात. ऐन पावसाळ्यात या नद्यांमधील गाळामुळे पाण्याची पातळी धोकादायक रीतीने वाढून यातील पाणी नदीकाठच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये, शहरामध्ये घुसून नागरिकांचे अतोनात नुकसान होत होते.

  मात्र रायगड जिल्हा प्रशासनाने 2022 पासून या समस्येवर निश्चितपणाने मात करण्यासाठी ठोस पावले उचलली. 2022 पासून या नद्यांमधील गाळ उपसण्याचे काम तातडीने सुरू केले. पहिल्या टप्प्यात जवळपास पाच लाख घनमीटर इतका गाळ उपसण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात मागील वर्षापर्यंत जवळपास पंधरा लाख घनमीटर गाळ उपसण्यात आला. अशाप्रकारे मागील जवळपास चार वर्षात 19 लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. ही एक मोठी उपलब्धी होती. जून 2026 पर्यंत आणखी बारा लाख घनमीटर गाळ उपसण्यात आला. यामुळे नदीची पाणी पातळी 0.75 मीटरने कमी राहण्यास मदत झाली. याचा सर्वात मोठा लाभ झाला तो या नदीकाठच्या शहरांना वस्त्यांना. नदीची पाणी पातळी जवळपास एक मीटरने कमी झाल्यामुळे अतिवृष्टीमुळे नदीतील पाणी हे आसपासच्या परिसरामध्ये पसरले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे पुराची दहशत बाळगून असलेल्या नागरिकांची भीती यावर्षी मात्र संपुष्टात आल्याचे दिसून आले.

    रायगड महसूल आणि पाटबंधारे विभागाने गेल्या काही वर्षात सातत्याने केलेल्या प्रामाणिक कामाचे हे फलित आहे. वर्षानुवर्षे पुराच्या भीतीने पछाडलेल्या नागरिकांना या भीतीपासून मिळालेल्या सुटकेचे जिल्हा प्रशासनालाही मनापासून अत्यंत समाधान मिळाल्याची भावना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी व्यक्त केली आहे.

0000000

संबंधित पोस्ट

राज्य सीईटी सेलच्या ‘सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी‘अटल’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे -उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी,करुन अहवाल द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे यंत्रणेस निर्देश…

हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागमाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

vishwatmaklokswamivarta

लातूर ग्रामीणच्या विकासपर्वाचे शिल्पकार आदरणीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा…👏🏻🎂🎊

कोविडबाबत नमुंमपा आरोग्य विभाग दक्ष – रूग्णालयांत राखीव बेड्स नियोजन नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे व वैयक्तिक स्वच्छता बाळगण्याचे आवाहन