vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा आयुष रुग्णालयात वृक्षारोपण उत्साहातऔषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड ; वृक्षसंवर्धनाचा संदेश..

जिल्हा आयुष रुग्णालयात वृक्षारोपण उत्साहातऔषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड ; वृक्षसंवर्धनाचा संदेश..

अहिल्यानगर, प्रतिनिधी: पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने जिल्हा आयुष रुग्णालय, अहिल्यानगर येथे राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन आर्मी कोअर समितीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी रुग्णालयाच्या आवारात विविध औषधी तसेच पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमास प्रा. हर्षल आगळे, जिल्हा सल्लागार, तसेच सनियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्या श्रीमती सविताताई मोरे, दत्ता गाडळकर, अजित कटारिया, राजेंद्र देशमुख, अभियंता प्रताप भाऊसाहेब काळे, संजय जोशी, बंडू पवार तसेच जिल्हा आयुष रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णमाला बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते रुग्णालय परिसरात बकुळ, आपटा, चिंच, कडुलिंब यांसह विविध औषधी तसेच पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थितांना वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनातील वृक्षांची भूमिका आणि वृक्षांची नियमित जोपासना करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याकरिता महानगरपालिकेकडून जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. तसेच पालकमंत्र्यांच्या ग्रीन आर्मी व वनमहोत्सव उपक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शौनक मिरीकर, डॉ. जयश्री म्हस्के, डॉ. शोभा धुमाळ, डॉ. कीर्ती शेळके, डॉ. नाझिया शेख, डॉ. हरलीन कौर पुरी, संगीता नन्नवरे, सहाय्यक अधिसेवक अजिंक्य पवार, वर्षा जाधव, विशाल केदारी, अश्विनी बोरगे, योगिता कदम, अविनाश नाबदे, अजिंक्य भिंगारदिवे, पवन शिसोदे, हर्षा फाळके, एलिझाबेथ तेलधुणे, चैतन्य निकम तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Oooo

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचा अनोखा पुढाकारआश्रमशाळेतील ‘पिंक रूम’ ठरतेय आदिवासी कन्यांच्या सुरक्षिततेची आणि आत्मसन्मानाची हक्काची जागा..!

महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी ‘संजीवनी अभियान’

जागतिक आरोग्य दिनी विविध आरोग्य योजनांचा शुभारंभ महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा-२०२५ चे आयोजन

एमबीबीएस वैद्यकीय  शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

vishwatmaklokswamivarta

पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यात एचआयव्ही/एड्स जनजागृती मोहीम

vishwatmaklokswamivarta