vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे – उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे,कणगर येथे अचानक भेट देऊन कामाची केली पाहणी; सरपंचांचे गणनापत्र स्वतः समक्ष भरून घेतले

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे – उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे,कणगर येथे अचानक भेट देऊन कामाची केली पाहणी; सरपंचांचे गणनापत्र स्वतः समक्ष भरून घेतले

अहिल्यानगर, प्रतिनिधी  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन गणनापत्रे भरून घेत आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सक्रिय सहकार्य करून गणनापत्र वेळेत भरून द्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी केले.

शनिवारी सुट्टीच्या दिवशीही उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी राहुरी तालुक्यातील कणगर गावाला अचानक भेट देऊन विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. पाहणीदरम्यान गावचे सरपंच सर्जेराव घाडगे यांचे गणनापत्र भरले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर श्री. गाढे यांनी स्वतः त्यांच्या समक्ष त्यांचे गणनापत्र भरून घेतले. तसेच उपस्थित ग्रामस्थांना मोहिमेचे महत्त्व पटवून देत प्रत्येक पात्र मतदाराने गणनापत्र भरून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले की, गणनापत्र भरून न दिल्यास मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यास अथवा नाव कायम राहण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरी भेट देतील, तेव्हा नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन गणनापत्र भरण्यास सहकार्य करावे. कुटुंबातील सदस्य बाहेरगावी असल्यास त्यांच्या वतीने कुटुंबप्रमुखाने गणनापत्र भरून द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.

 

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक गणनापत्रांचे वितरण पूर्ण झाले आहे. तसेच सुमारे २० टक्के गणनापत्रांची माहिती संगणकीय प्रणालीत नोंदविण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे अनेक मतदान केंद्रांवर शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते गौरव करण्यात येत असल्याची माहिती श्री. गाढे यांनी दिली.

यावेळी कणगर ग्रामस्थांच्या वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात गोविंद दिवे, भाऊसाहेब नालकर आणि सरपंच सर्जेराव घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच बाळासाहेब गाढे, भास्कर वारघुडे, बाबुराव घाडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच उत्कृष्ट कार्य करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी भारत खाटेकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व प्राथमिक शिक्षक श्री. उबाळे यांचा उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000

संबंधित पोस्ट

पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च करून भारताने पाकिस्तान मधील दहशतवाद्यांच्या खात्मा केल्यामुळे भाजपा जालना च्या वतीने जल्लोष..

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष-कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन

केंद्र सरकारनं ५-किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ…

राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्काराचे रविवारी वितरण,सोहळ्यास बहुसंखेने उपस्थित राहा-प्रा.शरद वंजारे

vishwatmaklokswamivarta

कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी..

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे