vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत,सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न

जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत,सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न

            जालना, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना रोजगार, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जालना यांच्या वतीने दि. 13 जुलै 2026, सोमवार रोजी महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

            सदर कार्यक्रम गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास अनिल तलरेजा, अध्यक्ष, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार समिती, जालना यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

         या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, करिअर समुपदेशन, रोजगार मेळावे, कॅम्पस प्लेसमेंट, इंटर्नशिप, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाबाबत मार्गदर्शन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी परस्पर सहकार्य करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होऊन उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यास चालना मिळणार आहे.

   कार्यक्रमादरम्यान जालना जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांचे प्राचार्य/प्लेसमेंट अधिकारी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, कौशल्यवृद्धीसाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनासोबत समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल परिहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्ता जाधव यांनी केल  सदर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कौशल्य विकास अधिकारी विशाल येवले तसेच अमोल बोरकर, नितीन लोकडे, प्रदीप डोळे, कैलास काळे, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे व गणेश सुपारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह घणसोली, सेक्टर-2 वसतिगृहाकरिता खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्याकरीता इच्छुक इमारत मालकांचे अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागामार्फत कोकण विभागातीलसर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी मोहीम..

बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान @narendramodi आज सायंकाळी ७ वाजता भाजप मुख्यालयातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

vishwatmaklokswamivarta

नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावेॲपद्वारे प्रक्रिया सुलभ ; अनुदान बंद होऊ नये म्हणून प्रशासनाचे आवाहन