vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना येथे 15 जुलै 2026 रोजी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”

जालना येथे 15 जुलै 2026 रोजी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”

जालना, प्रतिनिधी: जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना आणिपोलिस अधीक्षक कार्यालय,जालना, यांचे संयुक्त विद्यामानाने दिनांक 15 जुलै, 2026 रोजी बॅडमिंटन हॉल,पोलीस परेड ग्राउंड, जिल्हाधिकारी कार्यालय रोड, जालना, येथे सकाळी 10ते दुपारी 4वाजेपर्यंत “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजितकरण्यातआलाआहे. यासाठी646रिक्तपदे उपलब्ध आहेत.

        यामेळाव्यातएचएससी, कोणतेही पदवीधर, आयटीआय ट्रेडधारक (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, फिल्‍ड असिस्टंट मॅनेजर, अप्रेन्‍टीस ट्रेनी, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, ब्रांच ऑप्रेशनल मॅनेजर, संगणक ऑपरेटर,अप्रेंटिस, ड्रायव्हर, सेल्सएक्झिक्युटिव्ह, सर्व्हिस अॅडव्‍हायझरअसिस्टंट टेक्न‍िशियन, CMYKPY TRAINEE इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छूक उमेदवारासाठी एकूण 646 रिक्त पदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 19 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये भारत फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, जालना यांची 40 पदे,एनआरबी बेअरिंग्ज लिमिटेड, जालना., यांची 70 पदे, एल. जी. बालकृष्णन अँड ब्रदर्स प्रा. लि, जालनायांची 25 पदे,विक्रम टी प्रोसेसर प्रायव्हेट लिमिटेड, जालना यांची 6 पदे, कालिका स्टील अलॉयस लिमिटेड, जालनायांची 10 पदे,भाग्यश्री रोलिंगमिल प्रा.लि., यांची 20 पदे, लीलाई इलेक्ट्रिकल्स, जालनायांची03पदे, श्री. माऊली मोटार ड्रायव्हिंग, जालनायांची04पदे,अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालनायांची75पदे,आई इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, जालनायांची10पदे, स्टेट बँक ऑफ इंडिया लाइफ इन्शुरेंस जालना यांची 77 पदे,ॲक्सिस बँकजालना यांची 10 पदे,कलश सीड्स, छत्रपती संभाजी नगरयांची 20 पदे,टेक्नो क्राफ्ट फॉर्म वर्क लिमिटेड, छत्रपती संभाजी नगर यांची 90 पदे,गरवारे हायटेक लिमिटेड, छत्रपती संभाजी नगर यांची50 पदे,पोलिस अधीक्षक कार्यालय, जालना यांची 90 पदे,पोलीस ट्रेनिंग सेंटर, जालना यांची 11 पदे,देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था, जालना यांची 20पदे व जालना हॉस्पिटल, जालना यांची 15पदे असून या मेळाव्यासाठी वरील19 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

 

 

 

            या सुवर्ण संधीचा रोजगार जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि किमान पाच प्रतीत रिझ्युम/बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधारकार्ड/सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह सकाळी 09 वाजता उपस्थितराहावे.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच केंद्र शासनाच्या www.ncs.gov.inयासंकेतस्थळावर नोकरी साधक म्हणूननोंदणीकरावी. आपल्या होमपेजवरील Job Fair हा पर्याय निवडा.जालना जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा.रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा [SPECIAL JOB FAIR- 2 (2026-27) JALNA]या ओळीतील ॲक्शन मेनुतील दुस-या बटनावर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना Apply बटनावर क्लिक करा.यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन या दुरध्वनी क्रमांकावर02482-299033वर संपर्क करावा असे आवाहन सहायकआयुक्त, कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता, गणेश चिमणकर, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

धारावी टी जंक्शन तपासे चौकातील हम सब एक है शिल्पाची देखभाल करा, फेस कॉम संलग्न धारावीतील हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी

सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी२०२५ व बारावी बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुरू होणार आहे कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योगक केंद्राकडून विविध तांत्रिक व उद्योजकता विषयी मोफत प्रशिक्षण-इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

पिंपरी-चिंचवड इथं विषारी दारु प्यायल्यामुळे १३ जणांचा मृत्यू अनेकजण गंभीर. रुग्णालयात उपचार सुरू

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा· महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

पुना येथील आधी पर्वती, नंतर सारसबाग, आता शनिवारवाड्यात नमाजपठण…सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी…

vishwatmaklokswamivarta