vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी;

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी -शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत संपूर्ण राज्यात ‘मधकेंद्र’ (मधमाशा पालन) योजना राबवित आहे. या योजनेद्वारे मधपाळांना प्रशिक्षण आणि अनुदानासह व्यवसायासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे.इच्छूक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, छत्रपती संभाजीनगर (ईएसआय हॉस्पिटलसमोर, चिकलठाणा औद्योगिक वसाहत) येथील कार्यालयाशी किंवा कार्यालयीन दूरध्वनी ०२४०-२३३४५६९ वर संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठीdviosambhajinagar@gmail.com या ईमेलवर किंवा मधुक्षेत्रीक शुभम राजेश सोनटक्के यांच्याशी ७६६६४४७३०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मधमाशी पालनामुळे केवळ मध आणि मेणाची विक्री करून आर्थिक नफा मिळत नाही, तर मधमाश्यांच्या परागीकरणामुळे शेती पिकांच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होते. अत्यंत कमी जागा आणि भांडवलात सुरू करता येणारा हा एक उत्तम पूरक व्यवसाय आहे.

या योजनेत ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के लाभार्थी हिस्सा (स्व-गुंतवणूक) असे अर्थसाहाय्य दिले जाते. पात्र लाभार्थ्यांना मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण १० दिवसांचे विनामूल्य निवासी प्रशिक्षण. दिले जाते.

  महाबळेश्वर येथील मध संचालनालयात २० दिवसांचे प्रगत निवासी प्रशिक्षण. देखील दिले जाते.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर आणि १८ वर्षांवरील असावा. प्रगतीशील मधपाळांसाठी किमान १० वी उत्तीर्ण आणि १ एकर शेतजमिनीची अट आहे. अर्जासोबत ओळखपत्र, शैक्षणिक दाखला, ७/१२ उतारा, बँक पासबुक आणि फोटो आवश्यक आहेत.

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खादी ग्रामोद्योग मंडळ, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा राष्ट्रीय नमुना पाहणीची ७५ वर्षे ही मध्यवर्ती संकल्पना

१० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

देशी गायींच्या पालनपोषण अनुदान योजनेसाठी,अर्ज करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी मिळणार 24 लाखांपर्यंतचे अनुदान अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल 2026

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

vishwatmaklokswamivarta

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू