vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीसाठी क्लस्टरला मंजुरी,माथाडींच्या साडेतीन हजार धोकादायक घरांचा पुनर्विकास होणार नवी मुंबई महापालिकेने प्रसिध्द केली अधिसूचना…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या प्रयत्नांना यश

घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीसाठी क्लस्टरला मंजुरी,माथाडींच्या साडेतीन हजार धोकादायक घरांचा पुनर्विकास होणार नवी मुंबई महापालिकेने प्रसिध्द केली अधिसूचना…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या प्रयत्नांना यश

 

नवी मुंबई – माथाडी कामगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीच्या विकासासाठी क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या सोसायटीमध्ये वास्तव्य करणार्‍या माथाडी कामगारांच्या साडेतीन हजार घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वनआरकेच्या घरात वास्तव्य करणार्‍या या कुटूंबांना आता टूबीएचकेचे प्रशस्त घर मिळणार आहे. सिम्प्लेक्सचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

घणसोली येथील सेक्टर ७ मध्ये सिम्प्लेक्स सोसायटी ही माथाडी कामगारांची मोठी वस्ती आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या वसाहतीमधील घरे धोकादायक बनली आहेत. पिलर आणि भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. दररोज छताचे प्लास्टर पडल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांना आणि त्यांच्या कुटूंबांना जीव मुठीत धरून येथे वास्तव्य करावे लागत आहे. त्यामुळे या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याची मागणी केली. यासाठी रहिवाशांनी अनेक आंदोलनेही छेडली. मात्र हा पुनर्विकास राजकीय श्रेयवादात अडकला. त्यामुळे माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांची मृत्युच्या दाढेतून सुटका झाली नाही. मात्र खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी गोरगरीब माथाडी कामगारांना हक्काचा पक्का आणि मोठा निवारा मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

माथाडी कामगारांच्या या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना जाहीर करण्यात आली आहे. क्लस्टरची अधिसूचना आज महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी प्रसिध्द केली. त्यामुळे गेल्या सिम्प्लेक्सचा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून साडेतीन हजार घरांमध्ये वास्तव्य करणार्‍या सुमारे १६ हजार रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

खासदार रहिवाशांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले

 

माथाडी कामगारांच्या सिम्प्लेक्स सोसायटीच्या पुनर्विकासामध्ये अनेक अडथळे आले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न अखेर मार्गी लागला. पुनर्विकासासाठी रहिवाशांना मोठा संघर्ष करावा लागला. या संघर्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के आणि जिल्हाप्रमुख किशोर पाटकर हे रहिवाशांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच सिम्प्लेक्सच्या पुनर्विकासाठी क्लस्टरला मंजुरी मिळाली, अशी प्रतिक्रिया शिवसेना नगरसेवक सौरभ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट

20 मे रोजीच्या औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज;औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना

विभागीय माहिती कार्यालयातील-टायर-विक्रीबाबत आवाहन

🏥💙 *महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण**

इनोव्हेशन’ लोकोपयोगी असावे – पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर

संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन समाजात प्रेम, शांतता व सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

कल्याणमधला धक्कादायक प्रकार-मराठी तरुणीला परप्रांतीय कडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना