vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे व पालघर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे व पालघर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे व पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युद्ध विधवा आणि त्यांच्या अधीन असलेल्या पालकांसाठी (मुलामुलींसाठी) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत, ज्या पालकांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शालांत परीक्षा (इयत्ता १० वी), उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १२ वी), डिप्लोमा तसेच पदवी परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे आणि जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पुढील उच्च शिक्षण घेत आहेत, असे पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.

अर्जाबाबत महत्त्वाची माहिती: अर्जाची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२६, अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे. अधिक संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक: ०२२-४५६४१५९३ / ९९२००१६५८०.

तरी सर्व पात्र माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबातील संबंधित सदस्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि निश्चित मुदतीपूर्वी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

स्वित्झर्लंडमधील ‘दावोस’मध्ये गोव्याच्या ‘दैवी कणां’ची भुरळ; विज्ञानाला न उलगडणारे कोडे जागतिक पटलावर

विविध नागरी सुविधा प्रकल्पांची वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी केली महापौर व पदाधिका-यांसमवेत पाहणी..

रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

vishwatmaklokswamivarta

रस्ते मोकळे, श्वास मोकळा! — ठाणेकरांनी आता पुढे काय करावे?— विजयकुमार कट्टी

प्राथमिक शिक्षण विभागाचे स्थलांतर वागळे इस्टेट येथील कार्यालयात; स्वच्छ भारत मिशन व कृषी विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतर….

vishwatmaklokswamivarta

अमृत दुर्गोत्सव 2025’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ! शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

vishwatmaklokswamivarta