vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्व.अजीत दादा यांच्या जयंतीनिमित्त अरविंद चव्हाण यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप**सोनाई रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम*

*स्व.अजीत दादा यांच्या जयंतीनिमित्त अरविंद चव्हाण यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप**सोनाई रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम*

——————————————

जालना प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवून सेवा सप्ताह साजरा करण्यात आला , सोनाई रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तांदूळवाडी , ता.जालना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शुक्रवार रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय गांधी चमन येथे रूग्णांना फळ वाटप करण्यात आले .

          कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले .

          जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आ. अरविंदराव चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा संस्थेचे प्रमुख व कार्यक्रमाचें संयोजक आण्णासाहेब चितेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ,

 यावेळी जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शेख. महेमूद , प्रदेश सरचिटणीस धैर्यशील चव्हाण , शहर जिल्हा कार्याध्यक्ष मिर्झा अन्वर बेग ,प्रा. सोपानराव तेलगड , वंदना खांडेभराड , प्रभाकर घेवंदे , जालना ब्लॉक शहर अध्यक्ष शिवराज जाधव , पद्माकर हांडे , तालुका अध्यक्ष संतोष ढेंगळे , गणेश कावळे, सतीश वाहुळे,भानदास लहाने, परमेश्वर कापसे, गोरख कापसे, स. मोईन , संतोष घडे , अजीम बागवान , संतोष निकाळजे , शेख. अहेमद , सरला साठे ,अशोक गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर घेवंदे यांनी केले .

संबंधित पोस्ट

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न

मुंबईकरांसाठी खुशखबर-. मुंबईतील पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल  वॉकवे पार्कचे उद्घाटन झाले उद्घाटन…

एम. आर. डी. ए. स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta

दि. 21 व दि.22 जुलै रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज…

योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार,सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार  — मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले     

बुलढाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत