vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या जलद विस्ताराबाबत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सांगली सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या जलद विस्ताराबाबत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सांगली, प्रतिनिधी:- सांगली सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या जलद वेगवान विस्ताराबाबत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये ज्या ग्राहकांना पीएनजी (पाईपड नॅचरल गॅस) चे कनेक्शन मिळाले आहे व गॅस पुरवठा सुरळीत आहे, अशा ग्राहकांचे घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन रद्द करण्याच्या व एलपीजीचा पुरवठा गरजू ग्राहकांना पुरवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या.

    या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके , सर्व ऑईल मार्केटिंग कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पीएनजी कनेक्शन बंद झाल्याने घरगुती गॅस सिंलेडरचा अवैध वापर बंद होईल व तुटवडा निर्माण होणार नाही, असे मत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मांडले.

       सिटी गॅस डीस्ट्रीब्युशनचे अधिकारी यांना जास्तीत जास्त कनेक्शन वाढविण्याच्या व महानगरपालिका प्रशासनासोबत सहकार्य करुन सामान्य जनतेस कमीत कमी त्रास होईल अशा पध्दतीने कार्य पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या भागामध्ये महानगरपालिकेकडून पीएनजी अधिकारी यांना नाहरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, त्या भागामध्ये लवकरात लवकर सर्व इच्छुक ग्राहकांना पीएनजी कनेक्शन मिळतील याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. मिरज एमआयडीसीप्रमाणेच कुपवाड एमआयडीसीतही लवकरात लवकर पाईपव्दारे नॅचरल गॅसचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

००००००

संबंधित पोस्ट

आरोग्य विभागाच्या योजना सामान्य लोकांपर्यत प्रभावीपणे पोहोचवा- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईतील लालबाग येथून लालबागचा राजा राजा गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या –

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे लाभ घेण्याचे आवाहन

ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी ; ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॅापचे वाटप..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार–परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल- मुख्यमंत्री