vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणांना गती देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणांना गती देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

 

सांगली, प्रतिनिधी.) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे, डॉ. निलिमा सरप (लखाडे) आणि डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विषयांचा सविस्तर आढावा घेताना या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष स्नेहल भोसले, उपायुक्त नागनाथ चौगुले, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे, सदस्य सचिव मेघराज भाते, तसेच मिरज, जत, पलूस-कडेगाव, वाळवा-इस्लामपूर आणि खानापूर-विटा येथील प्रांताधिकारी उपस्थित होते.बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी समन्वय साधून कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना आयोगाच्या सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सांगली जिल्ह्यात कार्यरत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण तसेच आश्रमशाळा व वसतिगृह अधीक्षक पदांच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आश्रमशाळांना नियमित भेटी देऊन आवश्यक सूचना द्याव्यात आणि कार्यप्रणाली अधिक परिणामकारक करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा, असे निर्देशही आयोगाच्या सदस्यांनी यावेळी दिले.

00000

संबंधित पोस्ट

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध कला- क्रीडा स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन       

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.8 ते 21 एप्रिल 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले

रेल्वे मार्गे होणाऱ्या अमली पदार्थ व गुटख्याच्या तस्करीला आळा घाला-पश्चिम रेल्वे मार्गावरील मिरा रोड, भाईंदर स्थानकांवरील प्रवासी सुविधांसह सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा प्रवासी डेक तातडीने खुला करा; एसी लोकल वाढवा, एक्सप्रेस गाड्यांना भाईंदरमध्ये थांबा द्या पश्चिम रेल्वे मार्गावरील खासदारांच्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के आक्रमक..

vishwatmaklokswamivarta

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभऔषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार – मंत्री संजय सावकारे शेतकरी, महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर

vishwatmaklokswamivarta