vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा खुले कारागृहात आरोग्य तपासणी व हेपाटायटिस-बी लसीकरण

जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा खुले कारागृहात आरोग्य तपासणी व हेपाटायटिस-बी लसीकरण

गडचिरोली, प्रतिनिधी: जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम (NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह, गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी व हेपाटायटिस-बी लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी कैद्यांची आरोग्य तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना हेपाटायटिस-बी प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. तसेच हेपाटायटिस-बी व सी आजारांची कारणे, लक्षणे, प्रतिबंध, वेळेवर निदान व उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार हेपाटायटिस-बी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा खुले कारागृहाचे अधीक्षक सुभाष सोनवणे, वरिष्ठ कारागृह अधिकारी वैभव आत्राम व अन्य अधिकारी उपस्थित होते आरोग्याविषयी जनजागृती वाढण्यास आणि हेपाटायटिस प्रतिबंधाला चालना मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे“कर्करोग तपासणी वाहन लोकार्पण सोहळा”

vishwatmaklokswamivarta

*उंडाळे व काशीळ येथे0आरोग्य शिबिराचे आयोजन* 

vishwatmaklokswamivarta

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती कार्यक्रम तंबाखूचे अतिसेवन म्हणजे अनंत आजारांना निमंत्रण राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम…

सेवा संकल्प शिबीर’ जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

राष्ट्रीय उपशामक काळजी जनजागृती मोहिमेंतर्गत वृद्धांसाठी आरोग्य शिबिर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकांवर भर द्याजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा आढावा

vishwatmaklokswamivarta