vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा द प्रतिनिधी :- राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्यावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२६-२७ ही योजना राबविण्यात येत आहे.

शेतक-यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे. तरी शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळला भेट द्यावी.

 

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य सर्व राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर   जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने 

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश**मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना वयाची कागदोपत्री पडताळणी बंधनकारक*

उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे,जल, मृदसंधारणाच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले निर्देश – नागरिकांना दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवण्याच्या सूचना 

vishwatmaklokswamivarta

जालना यांच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान निबंध लेखन स्पर्धा – २०२६ आयोजित

माणुसकीची भूमिका जगणारा संवेदनशील अभिनेता आपल्यातून निघून गेला,नाना पाटेकर यांच्या अकाली निधनावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला शोक

रविवारी राखी मेल सुविधा उपलब्ध राहणार