vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगर च्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड,देशाची एकता हेच भारताचे खरे सामर्थ्य – माजी मा.आ.कैलास गोरंटयाल,देशाची एकता अखंडता हेच भारताचे सामर्थ्य आहे त्याचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे – भास्कर आबा दानवे

भाजपा जालना महानगर च्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड,देशाची एकता हेच भारताचे खरे सामर्थ्य – माजी मा.आ.कैलास गोरंटयाल,देशाची एकता अखंडता हेच भारताचे सामर्थ्य आहे त्याचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे – भास्कर आबा दानवे

 

जालना प्रतिनिधी : भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, जालना महानगरच्या वतीने एकता दौड (Run for Unity) चे आयोजन आज दि. ३१ ऑक्टोबर २०२६ शनिवार रोजी करण्यात आले, ही एकता दौड भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथन सुरू होऊन लक्कडकोट-बसस्थानक-मामा चौक-महावीर चौक-सुभाषचंद्र बोस चौक मार्गे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने एकता दौड ची सांगता झाली. यावेळी माजी आ.कैलास गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, सभापती अशोक पांगारकर, गटनेते महेश निकम, संगीताताई गोरंटयाल, मा.जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, जिल्हा सरचिटणीस अरुणा जाधव, वसंत शिंदे, अमोल कारंजेकर, सुनील पवार, शिवप्रकाश चितळकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद भताने, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे, संध्याताई देठे आदींची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा गौरव केला. देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी सरदार पटेल यांनी केलेले कार्य अतुलनीय असून त्यांच्या विचारांची आजच्या काळातही तितकीच आवश्यकता आहे. भारताची विविधतेतील एकता हीच देशाची खरी ताकद आहे. जात, धर्म, भाषा आणि प्रांत यापलीकडे जाऊन प्रत्येक भारतीयाने राष्ट्रहिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. राष्ट्रीय एकता दिवसाच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करून सांगितले की, सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशातील विविध संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिले. त्यांची राष्ट्रनिष्ठा, दृढ इच्छाशक्ती आणि देशाच्या एकतेसाठी केलेले कार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली एकता दौड ही देशाच्या एकात्मतेचा आणि अखंडतेचा संकल्प करणारा उपक्रम आहे. सरदार पटेल यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत देशाच्या विकासासाठी आणि राष्ट्रहितासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी शिवाजी शेजूळ, सिद्धिविनायक मुळे, आनंद झाड, महावीर ढक्का, दुर्गेश कुरील, जगदीश भरतीया, विक्रांत ढक्का, रोहित भूरेवाल, सुरज पणबिसरे, यश खरात, सतीश केरकळ, मंडळ अध्यक्ष अमोल धानुरे, मोहन राऊत, अॅड. रिमा खरात, सखुबाई पणबिसरे, पूनम स्वामी, अनामिका पांगारकर, पदमा मानधनी, स्नेहलता कामड, वैशाली बनसोडे, रमेश गौरक्षक, जगदीश भरतिया, कल्याण भदनेकर, अशोक पवार, आनंद झारकंडे, भगवान चांदोडे, अर्जुन गेही, विनोद रत्नपारखे, सोपान पेंढारकर, देविदास देशमुख, विजय कामड, राजेश स्वामी, मनोज इंगळे, नंदकिशोर गरदास, मनोज बिडकर, दत्ता जाधव, बाबुराव भवर, सुमित सुरडकर, करण निकाळजे, विकास कदम, विष्णू डोंगरे, विजय पवार, शिवराज नारीयलवाले, विठ्ठल इंदलकर, अजित मानधनी, अमोल भवर, जीवन सले, राजेश देसार, मुकेश चव्हाण, शाम उगले, गोपाल चौधरी, योगेश लहाने, हरिभाऊ नाटकर, गणेश कळकुंबे, गणेश शेवाळे, कैलास सोळुंके, गणेश जल्लेवार, राजाराम जाधव, गौरव गोधेकर, पियुष मुंगसे, गुलाब पणबिसरे आदींसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बाबासाहेब कोलते-जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, भाजपा 9860707500

 

संबंधित पोस्ट

गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या ‘एअर शो’चे सूक्ष्म नियोजन करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आढावा बैठकीत निर्देश

आपलं मंत्रालय’ अंकाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते प्रकाशन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगारमेळावामेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-मंत्री अतुल सावे .

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड-जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न

लाड -पागे समितीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती आणि आवास योजनेचा लाभ द्या- शेरसिंग डांगोर