vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अतिधोकादायक सी 1 प्रवर्गातील इमारतींचा पाहणी दौरा नळजोडणी व मलनि:सारण वाहिनी खंडित..

अतिधोकादायक सी 1 प्रवर्गातील इमारतींचा पाहणी दौरा नळजोडणी व मलनि:सारण वाहिनी खंडित..

 

     नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये अतिधोकादायक सी 1 प्रवर्गातील इमारतींमध्ये पावसाळी कालावधीत कोणताही दुर्घटना घडू नये यादृष्टीने काळजी घेत या इमारतींमधील रहिवास थांबवावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.

           त्या अनुषंगाने मा मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ अमोल पालवे व परिमंडळ २ चे उपायुक्त श्री. संजय शिंदे आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सी 1 प्रवर्गातील अतिधोकादायक इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तेथील रहिवास थांबावा याकरिता त्या इमारतींची नळ जोडणी व मलनिःसारण वाहिनी खंडित करण्यात आली.

          यामध्ये बेलापुर विभागातील –

1. व्हाईट हाऊस को-ऑप हो सोसायटी लि, प्लॉट क्र.२३३/२३४, सेक्टर- २१, नेरुळ (पुर्व) नवी मुंबई – ४०० ७०६.

 

         नेरूळ विभागातील –

1. शिवनेरी को. ऑप. हौ. सोसायटी लि.एन एल-५, बिल्डींग नं.१,२ & ३, प्लॉट नं.१, सेक्टर-३, नेरुळ, नवी मुंबई-४००७०६.

 

          वाशी विभागातील –

1. लिटिल फ्लॉवर को. ऑप. हौ.सो. लि जेएन-४ टाईप (बिल्डिंग नं. ९) से.९ वाशी

2. नूर को ऑप हो सो लि, प्लॉट नं १८, सेक्टर-०९ ऐ, वाशी, नवी मुंबई.3. सी १ व सी २ टाईप, बिल्डींग नं-१ ते १२, सेक्टर-०२, वाशी, नवी मुंबई.4. सुमंगल अपार्टमेट, बी-३ (ii) टाईप ओनर्स असोसीएशन, भु. क्र. ६, सेक्टर-३, वाशी नवी मुंबई

      कोपरखैरणे विभागातील -1. गगनगिरी को. ऑप हौ. सोसायटी लि, कंडोनियम क्र.०२, सी टाईप, इमारत क्र.१ ते १३, सेक्टर ९, कोपरखैरणे

2. सिल्व्हर नेस्ट को.ऑप.हौ. सोसायटी.लि., भु.क्र.८९, से.१५, (G+३), कोपरखैरणे नवी मुंबई-४००७०९

3. राज पॅलेस को.ऑप. हौ. सोसा. लि.प्लॉट नं.१६, सेक्टर-२, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०९.

       या इमारतींची नळजोडणी व मलनिःसारण वाहिन्या खंडित करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता श्री. मदन वाघचौडे तसेच संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व त्यांच्या अधिनस्त असलेले अतिक्रमण विभागाचे अधिकारी – कर्मचारी त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व सर्व संबंधित अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

 

#NMMC #nmmcencrochmentdepartment

#DilapidatedBuilding

संबंधित पोस्ट

नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून देशसेवेची सूवर्णसंधी…!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी उपाय योजावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत सूचना

vishwatmaklokswamivarta

केवळ पारंपरिक खेळांसाठी मैदान उपलब्ध कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा अभिनव उपक्रम

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

…अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 

vishwatmaklokswamivarta

सांगवी येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta