vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान’ ; ‘जागतिक स्तनपान सप्ताहा’निमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान’ ;

‘जागतिक स्तनपान सप्ताहा’निमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

 अमरावती, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने १ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध उपक्रमांद्वारे जिल्ह्यात ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

 

 आईच्या दुधातूनच जन्मानंतर पहिल्या एका तासात बालकास स्तनपान सुरु करणे तसेच जन्मापासून पहिल्या महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध देणे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असते. आईच्या दुधामुळे बालकाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, आजारांपासून संरक्षण होते , मानसिक व बौद्धिक विकासाला चालना मिळते. ‘शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान : जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा’ ही यावर्षी जागतिक स्तनपान सप्ताहाची संकल्पना आहे. यानुसार स्तनपानाच्या माध्यमातून नवजात बालकास आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळावी तसेच ९ ते ५९ महिन्यापर्यंतच्या बालकांना ‘अ’ जीवनसत्व पुरक आहार देण्याबाबतही जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.    जिल्ह्यात विविध उपक्रम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांच्या मार्गदर्शन आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. पराग राठोड यांच्या नियोजनात जागति‍क स्तनपान सप्ताहानिमित्ताने जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र ,आयुष्यमान आरोग्य मंदिरे तसेच गाव पातळीवर आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुनश्चर्या प्रशिक्षण,गर्भवती व स्तनदा मातांसाठी समुपदेशन विषयक कार्यशाळा, माता-पालक बैठका, शालेय स्तरावरील प्रश्नमंजुषा,निबंध व चित्रकला स्पर्धा तसेच स्नपानास पोषक वातावरण निर्मितीस पोषक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आशा स्वयंसेविका ,अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच महिला व बाल विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांमाध्यमातून गृहभेटी ,नियमित लसीकरण सत्रे,व्हिलेज हेल्थ, गावतापळीवरील समुपदेशनाद्वारे स्तनपान,शिशुपोषण,पूरक आहार,स्वच्छता आणि माता-बाल आरोग्या विषयी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व गर्भवती महिला, स्तनदा माता व त्यांच्या कुटुंबियांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन : ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

vishwatmaklokswamivarta

० ते १८ वयोगटातील मुलामुलींची आरोग्य तपासणी होणार जिल्ह्यात आजपासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम..

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 3752 लाख समात्राचे वाटप टाट मोहीम गतिमान करण्याचे मा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात “कुष्ठरोग शोध मोहीम सुरूविना निदान कुष्ठरुग्ण शोधण्यावर भर; २,४३२ पथके करणार सर्वेक्षण..

vishwatmaklokswamivarta

जागतिक लसीकरण सप्ताह .

स्टॉप डायरिया’ अभियानाचा शुभारंभ • जिल्ह्यातील १.८४ लाख बालकांना झिंक गोळ्या व ओआरएसचे वितरण   • ३१ जुलैपर्यंत ‘स्टॉप डायरिया अभियान’