vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांनी गाठली यशाची नवी पायरी,कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात; विविध गटांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांनी गाठली यशाची नवी पायरी,कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात; विविध गटांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

जालना | प्रतिनिधी,जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध बेल्ट श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक युवा आदर्शचे संपादक दीपक शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकट राजू गुंडला आणि डॉ. प्रीती वैष्णव यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कराटे हे केवळ आत्मसंरक्षणाचे साधन नसून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, एकाग्रता, संयम आणि संकटांचा सामना करण्याची मानसिक ताकद निर्माण करणारे प्रभावी माध्यम असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी नियमित सराव, शिस्त आणि सातत्य कायम ठेवून क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचे आवाहनही करण्यात आले.

विविध बेल्ट श्रेणींमध्ये विद्यार्थ्यांचे यशकराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ब्लॅक बेल्ट श्रेणीत कु. तन्वी खरटमल, कु. अश्विनी आजगे, कु. लावण्या गुडला, कु. दिव्यता कोठारी, कु. पूर्वा माने आणि कु. आरुषी वलकट्टी यांनी यश संपादन केले.

गोल्डन ब्राऊन बेल्ट श्रेणीत शेलमोन गुडेकर आणि नयन गोमती वाले यांनी यश मिळविले. ब्राऊन बेल्ट श्रेणीत कु. निवांशी वलकट्टी आणि ऋषिकेश श्रीराम यांचा समावेश आहे.

ब्ल्यू बेल्ट सेकंड श्रेणीत कु. वैष्णवी लोखंडे, कु. अनुष्का म्हेत्रे आणि देवेंद्र चिंचपुरे यांनी यश मिळविले. तर ब्ल्यू बेल्ट फर्स्ट श्रेणीत कु. आकांक्षा चिल्का, कु. समीक्षा कर्रे, कु. आराध्या खत्ती, कु. वैष्णवी लुटे, कु. दिवेश कर्रे आणि ओंकार गुट्टे यांनी यश संपादन केले.

ग्रीन बेल्ट सेकंड श्रेणीत मोहन झुंजुर, मल्हार पातुरकर आणि यशवर्धन चिल्का यांनी यश मिळविले. ग्रीन बेल्ट फर्स्ट श्रेणीत कु. तृप्ती उपरे, कु. आकाशी खर्डेकर, श्रीरुद्र लुटे, वेदांत मन्नद आणि अजित साळवे यांचा समावेश आहे.ऑरेंज बेल्ट श्रेणीत समर्थ डहाळे याने यश मिळविले. तर येलो बेल्ट श्रेणीत कु. स्नेहा काळुंके, कुशल वलकट्टी आणि प्रिन्स काळुंके यांनी यश संपादन केले.याशिवाय प्रेम गुल्लापेल्ली आणि शुभम नागरे या दोघांना कराटे ब्लॅक बेल्टचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला.

प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शनया सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सेन्साई रुपेन्द्र गोपाल पारचा आणि सेन्साई अमन रुपेन्द्र पारचा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी कठोर सराव, नियमित प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनातून परीक्षेत यश मिळविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अश्विनी आजगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सेन्साई रुपेन्द्र गोपाल पारचा यांनी केले.विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षावकराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे श्री म.स्था. जैन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पोरवाल मॅडम, श्री म.स्था. जैन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वानगोता सर, नगरसेवक अक्षय गोरंट्याल, महावीरजी ढक्का, राजेशजी राऊत, संजय भगत, रितेश अग्रवाल, यादव बाबू , गणेश श्रीराम, नवीनकुमार वलकट्टी, गणेश लुटे तसेच पालकवर्गाने कौतुक केले.

यशस्वी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून भविष्यातही कराटे क्षेत्रात सातत्याने प्रगती करावी, अशा शुभेच्छा मान्यवर व पालकांनी दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांमध्ये आणि प्रशिक्षण केंद्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय जनसंपर्कासाठी निघालेल्या भारतीय नौदलाच्या कार रॅलीला नौदल प्रमुखांनी हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त “अस्मिता महिला लीग” स्पर्धेकरीता जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स व वेटलिफ्टिंग निवडचाचणी 23 एप्रिल रोजी

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय सेपाक टाकरा स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

जागतिक कौशल्य स्पर्धा 2026-उमेदवारांच्या निवडीसाठी स्किल कॉम्पीटीशनØ तरुणांना कौशल्य स्पर्धेकरिता संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta