vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

फाळणी भयावहता स्मृतीदिवसानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रदर्शनाचे आयोजन 

फाळणी भयावहता स्मृतीदिवसानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रदर्शनाचे आयोजन

 

      नवी मुंबई प्रतिनिधी    1947 साली झालेल्या फाळणीदरम्यान भारतीयांनी सोसलेल्या दु:खाची व त्यागाची राष्ट्राला आठवण करून देण्यासाठी तसेच नागरिकांनी केलेल्या संघर्षाच्या व त्यागाच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात दि. 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी भयावहता स्मृतीदिवस (Partition Horrors Remembrance Day)’ म्हणून पाळण्यात येतो.

          यानिमित्त केंद्र व राज्य शासनामार्फत सूचित केल्याप्रमाणे केंद्र सरकारने निर्मिलेल्या प्रदर्शनाचे आयोजन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 13 व 14 ऑगस्ट 2026 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले आहे. नागरिक या प्रदर्शनाला भेट देऊन त्या वेळेच्या प्रसंगाची व परिस्थितीची माहिती जाणून घेत आहेत.

          या प्रदर्शनाला महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री. गणेश नाईक यांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली. नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील, उपमहापौर श्री. दशरथ भगत, माजी खासदार श्री.संजीव नाईक, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा पाटील व इतर मान्यवरांनीही प्रदर्शनास भेट दिली.

          हे प्रदर्शन 13 व 14 ऑगस्ट 2026 या दोन दिवशी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असून या माध्यमातून सामाजिक विभागणी आणि विसंवादाला दूर सारून एकतेचा, सामाजिक सलोख्याचा व मानवतेचा वसा जपण्याची भावना दृढ करण्याचा संदेश प्रसारित केला जात आहे. तरी नागरिकांनी आवर्जून या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

15 ते 17 ऑगस्ट 2026 कालावधीत नमुंमपा मुख्यालयात तिरंगा व वंदे मातरम् प्रदर्शनाचे आयोजन

               याप्रमाणेच यावर्षी 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत यावर्षी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला 1501 पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि. 15 ते 17 ऑगस्ट या कालावधीत महापालिका मुख्यालय, सीबीडी बेलापूर येथे तळमजल्यावर ‘वंदे मातरम्’ व ‘तिरंगा’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी त्याठिकाणीही भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

भूमित्र’ चॅटबॉटच्या माध्यमातून महसूल सेवा लोकांपर्यंत जलदगतीने पोहोचतील लोकार्पणप्रसंगी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजार ४५९ पोलिसांना मिळणार हक्काचे घर राज्यातील पोलीस अंमलदारांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार दोन वर्षांपासून प्रलंबित डीजी लोनला १७६८ कोटींची मंजुरी,आ. श्री. मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन, आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल-   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

भारताच्या भविष्यातील विकासाचे मुख्य केंद्र नवी मुंबईच*”मेघालय भवन” विकास संस्कृती आणि एकात्मतेचा संगम-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*’मेघालय भवन’ उभारणीसाठी जमीन हस्तांतरण व भूमीपूजन सोहळा संपन्न*