vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वदेशी एक्स्पो’ची तयारी अंतिम टप्प्यात आज उद्घाटनकेंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटनकेंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम

‘स्वदेशी एक्स्पो’ची तयारी अंतिम टप्प्यात आज उद्घाटनकेंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटनकेंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाच्यावतीने आयोजन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :- केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ ते १६ ऑगस्टदरम्यान सागर रिसॉर्ट, एमआयडीसी येथे आयोजित ‘स्वदेशी एक्स्पो २०२६’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरातून ७५ हून अधिक प्रदर्शक यात सहभागी झाले असून नागरिकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत आहे, जास्तीत जास्त नागरिकांना या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.१४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

नॅशनल ज्युट बोर्ड, ट्रायफेड यांसारख्या राष्ट्रीय संस्थांचाही या एक्स्पोमध्ये सहभाग असून त्यांचे सहकार्य लाभले आहे. ओडिशाची पट्टाचित्र, राजस्थानची पिचवाई, झारखंडची सोहराई, बिहारची मधुबनी, उत्तराखंडची ऐपण कला तसेच महाराष्ट्राची पैठणी यांसह विविध राज्यांतील पारंपरिक कला व हस्तकला पाहण्यासोबतच त्यांची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे

एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या प्रदर्शकांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक महिला उद्योजक व लघुउद्योगांचा समावेश आहे. एक्स्पोदरम्यान फॅशन शोसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या एक्स्पोला भेट देणार असून, त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांसह देशभरातून आलेल्या कलाकार व कारागिरांचा गौरव करण्यात येणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या स्वदेशी हातमाग व हस्तकला प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करावी, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सनेही एक्स्पोला पाठिंबा दिला असून आगामी दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणून स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून कारागीर व उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta

मेहकर बसस्थानकाचे लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ३० नवीन बसेस लवकर उपलब्ध होणार

इग्नाईट-२०२६’मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta

राज्यात घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही;वर्षभरात १५ लाख घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट-ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी 10 टक्के भाडेवाढ आकारणी…

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट