vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती; गोकुळ तर्फ पाटण येथे ८ घरकुले लाभार्थ्यांना हस्तांतरित

दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती; गोकुळ तर्फ पाटण येथे ८ घरकुले लाभार्थ्यांना हस्तांतरित

सातारा, प्रतिनिधी :- मौजे आंबेघर पाटण येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येत असलेल्या पुनर्वसन योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, गोकुळ तर्फ पाटण येथे उभारण्यात आलेली ८ घरकुले लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहेत. या घरकुलांमध्ये लाभार्थी प्रत्यक्ष वास्तव्यास असून, घरकुलांच्या बांधकामाचा दर्जा व गुणवत्ता समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुनर्वसन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेकडून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येत आहे. बांधकामाची कामे मंजूर नकाशे, तांत्रिक मानके, करारातील अटी व संबंधित गुणवत्ता नियंत्रणाच्या निकषांनुसार टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहेत.

दरम्यान, काही घरकुलांचे बांधकाम अद्याप निर्माणाधीन अवस्थेत असून, विविध बांधकाम घटकांची कामे अंतिम टप्प्याकडे सुरू आहेत. त्यामुळे निर्माणाधीन कामाच्या विविध टप्प्यांमध्ये काही भाग अपूर्ण किंवा अंतिम स्वरूपात नसणे ही बांधकाम प्रक्रियेतील स्वाभाविक बाब आहे. अंतिम गुणवत्ता ही काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित तांत्रिक तपासणी, गुणवत्ता नियंत्रण चाचण्या आणि अधिकृत अभिलेखांच्या आधारे निश्चित केली जाते

मौजे आंबेघर येथील दरडग्रस्तांसाठी गोकुळ तर्फ पाटण येथे पूर्ण झालेल्या ८ घरकुलांमध्ये लाभार्थी वास्तव्यास असून, त्यांनी घरकुलांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले आहे. घरकुलांचे बांधकाम उत्कृष्ट झाल्याबद्दल लाभार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत. याबाबत लाभार्थ्यांकडून देण्यात आलेले अभिवादनपत्रही उपलब्ध आहे.

पुनर्वसन हा संवेदनशील विषय असल्याने निर्माणाधीन कामाच्या छायाचित्रांवरून अंतिम गुणवत्तेबाबत निष्कर्ष काढण्याऐवजी संबंधित कामाची प्रत्यक्ष स्थिती, तांत्रिक प्रगती आणि गुणवत्ता नियंत्रणाची प्रक्रिया यांचा विचार करणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणेकडूनही कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन करण्यावर भर देण्यात येत आहे.

दरडग्रस्त कुटुंबांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या पुनर्वसन प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून, उर्वरित घरकुलांचे कामही नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत आहे

00000

संबंधित पोस्ट

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा- राज्यमंत्री आशिष जयस्वाल,साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्यासाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण**दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न* 

vishwatmaklokswamivarta

संकटातील मुलांसाठी जीवनरेखा… : १०९८ चाईल्ड हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ जून सायंकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार -शालेय शिक्षण विभाग

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

vishwatmaklokswamivarta