vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कॅन्सर तपासणी घराजवळ – मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीची नवी मुंबईत विशेष मोहीम

कॅन्सर तपासणी घराजवळ – मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीची नवी मुंबईत विशेष मोहीम

 

        आरोग्य प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राष्ट्रीय असांसर्गिक रोग तपासणी कार्यक्रमांतर्गत ३० वर्षावरील स्त्री व पुरुषांची नियमित तपासणी करण्यात येते व त्याची नोंदणी पोर्टलवर करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग याविषयी तपासणी व चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच संशयित रुग्ण आढळल्यास सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथे संदर्भित करण्यात येत आहे.

           या तपासणीमध्ये अधिक भर घालत दि. 3 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत शासनामार्फत कॅन्सर व्हॅन नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पाठविण्यात आली होती. या अनुषंगाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने नमुंमपा क्षेत्रात ठिकठिकाणी कॅन्सर तपासणी मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली.

          या कॅन्सर तपासणी विशेष मोहिमेत नवी मुंबईतील 1,292 नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली.

सदर व्हॅन मध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग बाबत तपासणी व चाचण्या करण्यात आल्या. या मोहिमेचे आरोग्य विभागामार्फत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले होते .

दि. 3 ऑगस्ट

– नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा – वाहन पार्कींग स्थळ : ना.आ.केंद्र इलठणपाडा – डॉ.सुषमा सरूकते नोडल अधिकारी – दिघा, इलठणपाडा, चिंचपाडा ना.आ.केंद्र परिसरातील नागरिक – तपासणी 150 रूग्ण – मुख कर्करोग 150 – स्तन कर्करोग 82 – गर्भाशय मुख कर्करोग 82 – सकाळी 10 ते सायं. 5 वा.

          दि. 4 ऑगस्ट – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कातकरीपाडा – वाहन पार्कींग स्थळ : राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली – डॉ.अपर्णा मालवणकर, नोडल अधिकारी – ऐरोली, नोसीलनाका, कातकरीपाडा, घणसोली, घणसोली सेक्टर 4 ना.आ.केंद्र परिसरातील नागरिक – तपासणी 182 रूग्ण – मुख कर्करोग 182 – स्तन कर्करोग 103– गर्भाशय मुख कर्करोग 103 – सकाळी 10 ते सायं. 5 वा.

          दि. 5 ऑगस्ट – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रबाळे – वाहन पार्कींग स्थळ : राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली – डॉ.वर्षा तळेगावकर, नोडल अधिकारी – कातकरीपाडा, ऐरोली, रबाळे, नोसीलनाका, घणसोली, घणसोली से.4, ना.आ.केंद्र परिसरातील नागरिक – तपासणी 154 रूग्ण – मुख कर्करोग 154– स्तन कर्करोग 84 – गर्भाशय मुख कर्करोग 84 – सकाळी 10 ते सायं. 5 वा.

          दि. 6 ऑगस्ट – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तुर्भे – वाहन पार्कींग स्थळ : माता बाल रूग्णालय तुर्भे – डॉ.गजाजन मिटके, नोडल अधिकारी – इंदिरानगर, कोपरखैरणे, कोपरखैरणे से.14, कोपरखैरणे से.16, पावणे, सानपाडा ना.आ.केंद्र परिसरातील नागरिक – तपासणी 280 रूग्ण – मुख कर्करोग 150 – स्तन कर्करोग 65 – गर्भाशय मुख कर्करोग 65 – सकाळी 10 ते सायं. 5 वा.

          दि. 7 ऑगस्ट – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरानगर – वाहन पार्कींग स्थळ : माता बाल रूग्णालय तुर्भे – डॉ.मैथिली शिंदे, नोडल अधिकारी – तुर्भे, महापे, जुहूगांव, वाशीगाव ना.आ.केंद्र परिसरातील नागरिक – तपासणी 260 रूग्ण – मुख कर्करोग 162 – स्तन कर्करोग 65 – गर्भाशय मुख कर्करोग 49 – सकाळी 10 ते सायं. 5 वा.

          दि. 8 ऑगस्ट – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवणे – वाहन पार्कींग स्थळ : माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ – डॉ.पुष्पा जवादे, नोडल अधिकारी – नेरूळ 1, नेरूळ 2, कुकशेत, शिरवणे ना.आ.केंद्र परिसरातील नागरिक – तपासणी 429 रूग्ण – मुख कर्करोग 189 – स्तन कर्करोग 49 – गर्भाशय मुख कर्करोग 120 – सकाळी 10 ते सायं. 5 वा.

          दि. 10 ऑगस्ट – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र करावे – वाहन पार्कींग स्थळ : ना.प्रा.आ.कें.करावे – डॉ.कविता बोराडे, नोडल अधिकारी – नेरूळ 1, नेरूळ 2, कुकशेत, शिरवणे, करावे ना.आ.केंद्र परिसरातील नागरिक – तपासणी 304 रूग्ण – मुख कर्करोग 150 – स्तन कर्करोग 77 – गर्भाशय मुख कर्करोग 77 – सकाळी 10 ते सायं. 5 वा.

          दि. 11 ऑगस्ट – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सीबीडी– वाहन पार्कींग स्थळ : मा.बा.रू. बेलापूर – डॉ.अर्चना तायडे, नोडल अधिकारी – करावे, सीबीडी ना.आ.केंद्र परिसरातील नागरिक – तपासणी 310 रूग्ण – मुख कर्करोग 155 – स्तन कर्करोग 66 – गर्भाशय मुख कर्करोग 89 – सकाळी 10 ते सायं. 5 वा.

          कर्करोग हा वेळीच ओळखला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. योग्य वेळी केलेली तपासणी भविष्यातील मोठा धोका टाळू शकते. म्हणूनच, जे नागरिक किंवा महिला या मोहीमेत तपासणी करायच्या राहून गेल्या असतील, त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका रूग्णालयात उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्य सेवा आणि तपासण्यांचा लाभ घ्यावा. तंबाखू, सुपारी यांसारख्या व्यसनांपासून दूर रहावे आणि शरीरात काहीही असामान्य बदल दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

          नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 30 वर्षावरील सर्व स्त्री, पुरूष नागरिकांनी असांसर्गिकरोग तपासणी कार्यक्रमांतर्गत आपल्या जवळच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

रोहणा येथे सिकलसेल व कुष्ठरोग ‘स्पर्श’ अभियानांतर्गत जनजागृती 🔴

vishwatmaklokswamivarta

रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन

विशेष लेख -मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय उपशामक काळजी जनजागृती मोहिमेंतर्गत वृद्धांसाठी आरोग्य शिबिर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापनास दिलेले प्रशिक्षण उपयुक्त – जिल्हाधिकारी अशोक काकडे – मेहता हॉस्पिटलमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

सिरोंचा येथे दिव्यांग तपासणी शिबिर उस्फुर्त प्रतिसाद ; ८१६ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी  कडक ऊन अन लाभार्थ्यांचा ओघ… तरीही थकली नाही डॉक्टरांची टीम;