vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

पिंपळगाव देवी येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

पिंपळगाव देवी येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

बुलढाणा, प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कस काय?’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १० व ११ ऑगस्ट रोजी सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पिसे, डॉ. ऋषिकेश राठोड, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, आरोग्य सहाय्यक, सुनील लोखंडे, बाजीराव पडघार, गटप्रवर्तक तसेच आशा समन्वयक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

दोन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. ऋषिक शाह, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंडे, कविता खाडे, सुनीता जंबाजळ आणि सुलोचना पहाडे यांनी सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा, समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन, आरोग्य जनजागृती तसेच ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे तसेच समुदायाचा आरोग्य व्यवस्थापनातील सहभाग बळकट करणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर आरोग्यविषयक विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम व संपन्न करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

00000

संबंधित पोस्ट

दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही’- डॉ. सुधा कांकरिया लिंगगुणोत्तर कमी असलेल्या १६ गावांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न.

जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी आयोजन*

vishwatmaklokswamivarta

अगदी अल्प प्रमाणातील मद्यपानानेही मुखाचा कर्करोग होण्‍याचा धोका -अभ्‍यासातून धोक्याची सूचना ‘टाटा मेमोरियल सेंटर’च्या नवीन विस्तृत अभ्यासातून निष्‍कर्ष

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संवेदनशीलतेने विट्याच्या रेयांश पवारला मिळाले जीवनदान- जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात दात्यांचा मोलाचा हातभार- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतूनही मिळाले एक लाख पंच्याहत्तर हजार…