*तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी आयोजन*
आरोग्य प्रतिनिधी-सातारा, – जिल्हा रुग्णालय सातारा येथे तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालय सातारा, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, पुणे व रोटरी क्लब ऑफ वाई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय, सातारा येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामधून निवड झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया दि. २० व गरजेनुसार दि.२१ डिसेंबर रोजी मोफत करण्यात येणार आहेत. यासाठी पुणे येथील तज्ञ डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया करण्यासाठी येणार आहे.
सदर शिबिरासाठी शुक्रवार दि. 19 डिसेंबर रोजी रुग्णांनी सकाळी दहा वाजता नेत्र विभाग सातारा येथे आधार कार्ड व रेशनिंग कार्ड सोबत घेऊन यावे व अधिकाधिक गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी यांच्याशी संपर्क साधावानोडल ऑफिसर श्री. मिलिंद शिंदे मोबाईल नंबर. ९४२३८०४०४९इनचार्ज सिस्टर – श्रीमती सुषमा चव्हाण मोबाईल नंबर. ९२८४७०४४३८