vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जलसंधारण सप्ताहःप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे पाणलोट विकासात वाढ

जलसंधारण सप्ताहःप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे पाणलोट विकासात वाढ

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जलसंधारण ही लहान लहान उपाययोजनांमधून साधली जाणारी मोठी किमया आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या लहान लहान उपाययोजनांनी जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात विकासात वाढ झाली आहे. जिल्ह्यात खुलताबाद, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यात ही कामे झाली आहेत.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत ही कामे घेण्यात आली आहेत. त्यात वैयक्तिक उत्पादन पद्धतीत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येऊनही मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक थेंबाद्वारे मोठे उत्पादन (Per Drop More Crop) हे उद्दिष्ट साधण्यास यश आले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीवर तर झाला आहेच शिवाय शेतकऱ्यांच्या मातीची गुणवत्ता व पाणी बचतीवरही झाला आहे

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलताबाद या तालुक्यातील 62 गावांमध्ये एकून 678 कामे राबविण्यात आली. त्यात शेततळे, ग्रॅबियन स्ट्रकचर, दगडी बांध, सिमेंट नाला बांध, माती बांध, माती नाला बांध, बांधालगत समतल चर, रिचार्ज शाफ्ट इ. जलसंधारण उपचार राबविण्यात आले. गेल्या वर्षभरात ही कामे झाली. त्यावर 15 कोटी 27 लक्ष 35 हजार रुपये इतका खर्च झाला असून त्याद्वारे 2241.53 सहस्त्र घनमिटर इतकी साठवण क्षमता योजना अंमलात आल्यापासून निर्माण झाली आहे.

त्याचप्रमाणे वैयक्तिक उत्पादन पद्धतीसाठी शेतकऱ्यांना दिलेला लाभांमध्ये याच गावांमध्ये 2033 लाभार्थ्यांना पीव्हीसी पाईप, विद्युत पंप, ठिबक संच, तुषार सिंचन संच अन्य कृषी यंत्रे व अवजारे इ. देण्यात आले. त्यावर 4 कोटी 77 लक्ष 67 हजार रुपये इतका खर्च करण्यात आला. त्यातूनही शेतकऱ्यांच्या सिंचनाची गुणवत्ता सुधारुन पाण्याची बचत व उत्पादनात वाढ ह्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. शिवाय नियंत्रित सिंचन दिल्यामुळे जमिनीचा ओलावा टिकून मातीची गुणवत्ता सुधारली, हा दीर्घकालीन फायदा झाला.

०००००

संबंधित पोस्ट

मतदान केंद्राजवळचे आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांचा ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख / ५ जून जागतिक पर्यावरण दिन  पर्यावरणाचा जागर घराघरातून वाढवूया ! 

१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील आज देणार

जिल्हा महिला व बाल विकास विभागाने रोखले 131 बालविवाह बालविवाहाच्या 2 प्रकरणात गुन्हे दाखल…