vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आयुष ग्राम गुणवरे ता. फलटण येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

आयुष ग्राम गुणवरे ता. फलटण येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

फलटण: प्रतिनिधी आयुष ग्राम गुणवरे (ता. फलटण) येथे ‘जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे’ (Geriatric Health Check-up Camp) यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा परिसरातील एकूण १५३ ग्रामस्थांनी लाभ घेतलाटी.बी. मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत शिबिरादरम्यान १०१ संशयितांचे चेस्ट एक्स-रे काढण्यात आले, ज्यामध्ये ०२ संशयित रुग्ण आढळले. तसेच ७३ जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ०३ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले. याशिवाय, सर्व सामान्य ग्रामस्थांची उच्च रक्तदाब व मधुमेहासाठी मोफत रक्तशर्करा तपासणी करण्यात आली. या तपासणीत उच्च रक्तदाबाचे ०४ तर मधुमेहाचे ०५ नवीन रुग्ण आढळून आले. आवश्यक असणाऱ्या रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधोपचार पुरवण्यात आले

या प्रसंगी उपस्थितांना बदलत्या जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्त्व आणि ऋतूनुसार दिनचर्या कशी असावी, याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

मा. वनिता आढाव (सदस्या पं स फलटण) यांच्या हस्ते धन्वतरी पुजन करणेत आले..

प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन:सदर शिबिर डॉ. संतोष कोंडके (तालुका आरोग्य अधिकारी, फलटण),डॉ. मिथुन पवार (जिल्हा आयुष अधिकारी, सातारा),आणि डॉ. गीतांजली साळुंखे (वैद्यकीय अधिकारी, आयुष्मान आरोग्य मंदिर-आयुष, गुणवरे) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमासाठी डॉ.प्रियाताई शिंदे ( जिल्हा परिषद अध्यक्ष), श्री. राजूभैय्या भोसले ( उपाध्यक्ष जिल्हा परिषद ), डॉ. सुनील चव्हाण (जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा) व डॉ. केदार कुलकर्णी (वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, बरड) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत सानप (समुदाय आरोग्य अधिकारी, आयुष्मान आरोग्य मंदिर, गुणवरे) यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), गुणवरे तसेच प्रा आ कें बरड येथील सर्व कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

संबंधित पोस्ट

आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनाही राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिन सोहळयाचं निमंत्रण. 

vishwatmaklokswamivarta

आरोग्य यंत्रणांचा आढावाजिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करा-जिल्हाधिकारी स्वामी

कर्करोग तपासणी, जनजागृती मोहीम वेळोवेळी राबवा- जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हाधिकारी कार्यालयात मौखिक कर्करोग जनजागृती अभियान

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार

विधान परिषद-: प्रश्नोत्तरे सचिन होले यांना पाणी पुरवठा योजनेची कामे नाहीत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,सचिन होले यांना दिलेल्या वर्ग-५ स्थापत्य प्रमाणपत्र प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी