vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा रविवार पासून तीन दिवसांचा अमरावती जिल्हा दौरा

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा रविवार पासून तीन दिवसांचा अमरावती जिल्हा दौरा

               अमरावती, प्रतिनिधी बालगृहांची पाहणी व तपासणी, बालकांच्या हक्कांच्या अनुषंगाने विविध बाबींचा आढावा, तसेच संबंधित प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली ६ ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोगाचा अमरावती जिल्हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी कळविले आहे.

        नियोजित कार्यक्रमानुसार ६ सप्टेंबर रोजी आयोगाचे अध्यक्ष व सदस्य अमरावती जिल्ह्यातील बालगृहांना भेटी देणार आहेत. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० वा. दरम्यान विविध प्रकरणांची सुनावणी घेण्यात येणार आहे. तर दुपारी १२.३० ते २ वा. पर्यंत आढावा बैठक होणार आहे.दुपारी ३ ते सायं ६ वा. दरम्यान जिल्ह्यातील बालगृहास भेटी देणार आहे. ८ सप्टेंबर रोजी मेळघाट क्षेत्रास आयोग भेट देणार असून प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग अमरावती व मेळघाट तसेच इतर बहुजन कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहे.

        आयोगाच्या दौऱ्यात बालगृहांमध्ये बालकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, निवास व भोजन व्यवस्था, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा, बालकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना, समुपदेशन व पुनर्वसनाची कार्यवाही तसेच बालकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी याबाबत पाहणी करण्यात येणार आहे. तसेच, बाल हक्क संरक्षणाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात येणार असून, संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकडून विविध विषयांचा आढावा घेण्यात येणार आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत आयोगाकडून मार्गदर्शन व सूचना करण्यात येणार आहेत.

 

०००००

संबंधित पोस्ट

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा…

प्रधानमंत्री पीक विमा योजना १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी * शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन * जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स अधिकृत विमा कंपनी

इंडिगो आणखी अडचणीत– 5 वर्षांपूर्वीचं कोट्यवधींचं प्रकरण समोर, नोटिस जारी

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी खुशखबर-. मुंबईतील पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल  वॉकवे पार्कचे उद्घाटन झाले उद्घाटन…

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचा संवेदनशील समन्वय,मेंदूमृत रूग्णाच्या अवयवदानातून तिघांना मिळाले जीवनदान..!- हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत राहणार

vishwatmaklokswamivarta