
मिस वर्ल्ड २०२६ स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या न्हा ट्रांग या शहरात होणार आहे.
विदेश प्रतिनिधी-
मिस वर्ल्ड २०२६ स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या न्हा ट्रांग या शहरात होणार आहे.यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांचे एकूण १११ स्पर्धक भाग घेत आहेत.
फेमिना मिस इंडिया वर्ल्ड विजेती निकिता पोरवाल यावर्षी या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. याआधी भारताच्या मानुषी छिल्लर हिनं २०१७ मध्ये हा किताब जिंकला होता.



