vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

व्हेनेझुएलाच्या उत्तर भागाला-भूकंपाचा धक्का10 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.  ‘या’ देशात आणीबाणी लागू; आजूबाजूचे देशही हादरले ..

व्हेनेझुएलाच्या उत्तर भागाला-भूकंपाचा धक्का10 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.  ‘या’ देशात आणीबाणी लागू; आजूबाजूचे देशही हादरले

 विदेश प्रतिनिधी-व्हेनेझुएलाच्या उत्तर भागाला-भूकंपाचा धक्का10 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.  ‘या’ देशात आणीबाणी लागू; आजूबाजूचे देशही हादरले

व्हेनेझुएलाच्या उत्तर भागाला बुधवारी एकामागून एक दोन मोठे भूकंपाचे धक्के बसले. यापैकी पहिला भूकंपाचा धक्का हा 7.2 रिस्टर स्केलचा होता. हा पहिला धक्का बसल्यानंतर 39 सेकंदांमध्ये दुसरा मोठा भूकंप झाला. दुसरा धक्का हा 7.5 रिस्टर स्केलचा होता. या दोन्ही धक्क्यांमध्ये एकूण 10 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक वेळेनुसार सुमारे संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी हा भूकंप झाला. हे दोन्ही भूकंप व्हेनेझुएलाच्या अलीकडील इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक मानले जात आहेत.

कुठे होता केंद्रबिंदू?काराबोबो आणि याराकुय राज्याजवळ मोरॉन, मॉन्टाल्बान, सॅन फेलिप, युमारे भागांना धक्का देणाऱ्या या भूकंपाचे केंद्रबिंदु होते. काराकासपासून सुमारे 160 किमी पश्चिमेला, कॅरिबियन किनाऱ्याजवळ भूकंपाचे केंद्रबिंदु असल्याचं सांगण्यात आलं आहे. जमिनीपासून खाली 10 ते 12 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदु होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्हेनेझुएला सरकारने देशात तातडीने आणीबाणी जाहीर केली आहे.

त्सुनामी अलर्ट जारी,व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये अनेक इमारती कोसळल्या असून मोठं नुकसान झालं आहे. लॉस पालोस ग्रांदेससारख्या भागांमध्ये मोठी आर्थिक आणि जिवितहानी झाली आहे. रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांना फटका बसल्याचं दिसत आहे. कोलंबिया, त्रिनिदाद यासारख्या छोट्या शेजारील देशांमध्येही हे धक्के जाणवले. भूकंपानंतर काही काळासाठी त्सुनामी अलर्ट जारी करण्यात आला होता. नंतर मात्र हा इशारा रद्द करण्यात आला.

10 हजारांहून अधिक मृत्यू,जगभरातील भूकंपाच्या घटनांवर लक्ष ठेवून असणाऱ्या युनायटेड स्टेट्‍स जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची व्याप्ती पाहता मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे. किमान 10 हजार लोकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती, यूएसजीएसने दिली आहे. मृतांची संख्या 10 हजार ते 1 लाखांदरम्यान असण्याची 44 टक्के शक्यता असल्याचं यूएसजीएसने म्हटलं आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे अनेक बहुमजली इमारती अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. संपूर्ण काराकास शहरात धुळीचे साम्राज्य पसरलं आहे. अनेक लोक ढिगाऱ्यांखाली अडकल्याची शक्यता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांचा नेमका आकडा समोर आलेला नाही मात्र जखमींची संख्या मोठी असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. व्हेनेझुएलामधील सरकारी अधिकारी नुकसानाचे मूल्यमापन करत आहेत.यूएसजीएसच्या मते, मुख्य भूकंपानंतरही आणखी तीव्र आफ्टरशॉक्स येण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे भूस्खलन होण्याचा धोकाही वाढला आहे.

संबंधित पोस्ट

कोलंबियात भीषण विमान अपघातात ६६ जणांचा मृत्यू, ४८ जणांना वाचवण्यात यश.

बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर आता वझिरिस्तानमध्येही स्वतंत्र राष्ट्रासाठी आंदोलन सुरू

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

रागासा चक्रीवादळ चीनच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकले असून, आता ते वियतनामकडे त्या मार्गावर प्रशासनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले आहे.

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशातील पुन्हा एकदा हिंदू व्यावसायिकावर गोळ्या झाडून हत्या

भारतीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची स्टॉकहोममध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठक