vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

इसराइल कडून गाझा पट्टीतील युद्ध थांबणार – हमासकडून शांतता करारास सहमती दर्शविली

इसराइल कडून गाझा पट्टीतील युद्ध थांबणार – हमासकडून शांतता करारास सहमती दर्शविली

विदेश प्रतिनिधी-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर हमासने अखेर शांतता योजनेला सहमती दर्शवली आहे. गाझा पट्टीत सुरू असलेले युद्ध थांबवून मध्यस्थी चर्चेत सहभागी होण्याचा निर्णय हमासने घेतल्याची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांतून समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी हमासला स्पष्ट इशारा दिला होता की, “रविवार संध्याकाळपर्यंत आमच्या शांतता कराराला मान्यता न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.” या कठोर भूमिकेनंतर हमासने चर्चेसाठी आपली तयारी दर्शवली.

या योजनेनुसार हमासने गाझा पट्टीवरील नियंत्रण सोडण्यास आणि जखमी इस्रायली सैनिकांना मुक्त करण्यास सहमती दर्शवली आहे. युद्धात सहभागी झालेल्या नागरिकांना सुरक्षिततेची हमी देण्यात येणार असून, शस्त्र खाली ठेवणाऱ्यांना माफी देण्यात येईल. युद्ध संपल्यानंतर गाझा पट्टीत तातडीने मानवी मदत आणि पुनर्बांधणीचे कार्य सुरू होईल. पायाभूत सुविधांची दुरुस्ती, वैद्यकीय मदत आणि विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे.

इस्रायलनेही या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. तथापि, काही मुद्द्यांवर अजून चर्चा सुरू असून अंतिम करारासाठी प्रयत्न सुरू आहेत. ट्रम्प यांनी या योजनेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “गाझा पट्टीतील युद्ध समाप्त करणे, कैद्यांची देवाणघेवाण करणे आणि हजारो निष्पाप लोकांचे जीव वाचवणे हे या योजनेचे प्रमुख ध्येय आहे.” त्यांच्या मते, या करारामुळे पश्चिम आशिया प्रदेशात स्थैर्य व शांततेचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो. युद्ध, हिंसा आणि मानवी संकटाचा शेवट करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान  नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राजकीय दौऱ्यासाठी आज सेशेल्समध्ये दाखल झाले. विमानतळावर सेशेल्सचे राष्ट्रपती पेट्रीक हार्मिनी यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

इसराइल गाजा संघर्ष-अमेरिकेच्या पाठिंब्याने गाजा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनने म्हटले आहे की हल्ल्यात ५ मदत कामगारांचा मृत्यू,दोन डझनहून अधिक पॅलेस्टिनींना घेऊन जाणाऱ्या बसवर हमासने हल्ला केला, असे संघटनेचे म्हणणे आहे.

बँकॉकला शक्तिशाली भूकंपाचा धक्का! इमारती कोसळल्या, लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा घाबरून पळून गेले, भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील सागिंगजवळ…

मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार• एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी..

थायलंड पोलिसांचे एक विमान समुद्रात कोसळले पाच पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू

बांगलादेशात 1,400 लोक मारले गेले, मोहम्मद युनूस सरकारमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आले, संयुक्त राष्ट्राचा अहवाल भयावह .

vishwatmaklokswamivarta