vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

वेल्श सरकारच्या गुंतवणुकीच्या स्वारस्याचे महाराष्ट्रात स्वागत– वेल्श नॅशनल डे निमित्त राजशिष्टाचार मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

वेल्श सरकारच्या गुंतवणुकीच्या स्वारस्याचे महाराष्ट्रात स्वागत– वेल्श नॅशनल डे निमित्त राजशिष्टाचार मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि नाविन्यपूर्ण शक्तीचे केंद्र आहे. येथे भागीदारीसाठी मोठी संधी आहे. वेल्श सरकारच्या तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी असलेल्या स्वारस्याचे महाराष्ट्र स्वागत करीत असून वेल्शसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्र वचनबद्ध आहे, अशा शब्दात राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी वेल्श सरकारच्या सेंट डेव्हीड डे (वेल्श नॅशनल डे) निमित्त शुभेच्छा दिल्या.

सेंट डेव्हीड डे निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात वेल्श सरकारला शुभेच्छा देताना श्री.रावल बोलत होते. वेल्श सरकारचे कॅबिनेट सचिव जेरेमी माइल्स, वेल्श सरकारचे भारतातील प्रमुख मिचेल ठाकर आदी यावेळी उपस्थित होते.

 राजशिष्टाचार मंत्री रावल म्हणाले, सेंट डेव्हिड डे हा सेवा, समर्पण आणि समुदायाच्या चीरस्थायी मूल्यांचे प्रतीक आहे. प्रगती आणि विकासासाठी आमची सामायिक वचनबद्धता आम्हाला सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रेरित करते. महाराष्ट्र आणि वेल्श एकत्र काम करून विकासाबरोबरच नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो आणि अधिक समृद्ध भविष्यासाठी योगदान देऊ शकतो, असा मला विश्वास आहे.

सेंट डेव्हिड डे साजरा करताना कार्डिफ विद्यापीठाचा माजी विद्यार्थी या नात्याने मला आनंद आणि वैयक्तिक संबंधाची भावना असून माझ्यासाठी हा प्रसंग विशेष महत्त्वाचा असल्याचे श्री.रावल यांनी सांगितले. कार्डिफ विद्यापीठात असताना मी आत्मसात केलेल्या तत्त्वांनी माझ्या दृष्टीकोनाला आकार दिल्याचे त्यांनी नमूद केले. आज सेंट डेव्हिड डे साजरा करीत असताना महाराष्ट्र आणि वेल्शमधील संबंधांना जोपासण्यासाठी, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

0000

 

बी.सी.झंवर/विसंअ/

संबंधित पोस्ट

आताची मोठी बातमी दुबई इथं सुरु असलेल्या एअर शो -२५ दरम्यान भारताचं लढाऊ विमान तेजस ला अपघात होऊन ते कोसळल्याचं वृत्त आहे. या अपघातात, वैमानिकाचा मृत्यू .

vishwatmaklokswamivarta

उझबेकिस्तानच्या दौऱ्यात पंतप्रधानांची उझबेकिस्तानच्या अध्यक्षांशी औपचारिक चर्चा

बांगलादेशात 1,400 लोक मारले गेले, मोहम्मद युनूस सरकारमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आले, संयुक्त राष्ट्राचा अहवाल भयावह .

vishwatmaklokswamivarta

🇨🇦 कॅनडाचा स्वबळावर संरक्षणाचा मोठा निर्णय: आर्क्टिक सीमांच्या सुरक्षेसाठी २६ अब्ज डॉलर्सची तरतूद!

अमेरिकेच्या २५० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्कमध्ये रंगलेल्या जागतिक नौदल सोहळ्यात ‘आयएनएस सुदर्शिनी’ने केले भारताचे प्रतिनिधित्व!

vishwatmaklokswamivarta

रेशीम, रेशीम उत्पादन, हातमाग आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन संधी खुल्या करण्यासाठी भारतीय प्रतिनिधिमंडळाची व्हिएतनामला भेट

vishwatmaklokswamivarta