vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीत एम एस आर टी सी स्मार्ट कार्ड साठी महिला व ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद..

धारावीत एम एस आर टी सी स्मार्ट कार्ड साठी महिला व ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद..

मुंबई प्रतिनिधी- एसटी महामंडळ संलग्न एन सी एम टी सी हे सर्व सोयींनी उपयुक्त असे वय वर्ष 12 पुढील मुली व महिलांसाठी तसेच 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवासासह मेट्रो व इतर ठिकाणी कॅशलेस स्वरूपात व सवलती मध्ये मिळणारे एमएसआरटीसी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत स्थळ जय भवानी क्रीडा मंडळ नवी चाळ क्रॉस रोड धारावी या ठिकाणी एका विशिष्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी मुंबई झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावी बीट नंबर दोन अलका साबळे जय भवानी क्रीडा मंडळाचे गिरीराज शेरखाने हॅपीनेस ज्येष्ठ नागरिक संघाचे दिलीप गाडेकर यांनी पुढाकार घेऊन सदर शिबिराचे आयोजन केले गेले विभागातील बारा वर्षावरील मुली व महिला तसेच 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांन सह शेकडो लोकांनी आपली नाव नोंदणी करून याचा लाभ घेतला सदर स्मार्ट कार्ड एक सुरक्षित कॅशलेस व एसटी सवलत व मेट्रो प्रवासात सहज वापरण्यायोग्य असल्याने लोकांना याचा फायदा होणार आहे मिळालेल्या प्रतिसाद पाहता लवकरच एखाद्या रविवारी एक्स्ट्रा कॅम्प घ्यावा अशा सूचना आल्या आहेत अनेकांनी येताना आधार कार्ड प्रवेश शुल्क भरून आपल्या हाताचा ठसा देऊन आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे अशांना महिन्याभरात च्या आत त्याच जागी एनसीएमसी कार्ड वाटप करण्यात येणार आहेत अशी माहिती श्री गिरीराज शेरखाने व दिलीप गाडेकर यांनी दिली सदर कार्यक्रमासाठी श्री चंद्रकांत जाधव सौ अलका साबळे श्रीमती सविता शेरखाने श्री गोविंद भोईटे श्री गौतम वटकर यांनी शिस्तीने व स्वयंसेवी पद्धतीने मदत करून कार्यक्रम यशस्वी केला

संबंधित पोस्ट

रायगड मधून बातमी- रायगडमधील तरुणाची देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट, गुन्हा दाखल

मुंबई महानगरपालिका निवडणुका : राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला, जागावाटप

vishwatmaklokswamivarta

भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका-विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे प्रेम जाधव यांची मागणी

जालन्यातील जनहिताच्या प्रमुख प्रकल्पांना निधी उपलब्ध करा – खा. डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. घाणेवाडी तलाव दुरुस्ती, आयसीटी कॉलेज, पाणी पुरवठा, प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनेसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला, पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्याची केली मागणी…

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ, पुढचे १५ महिने राहणार देशाच्या सरन्यायाधीशपदी.

vishwatmaklokswamivarta

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे व अवकाळी पावसाची शक्यता; मच्छिमारांना सतर्कतेचं आवाहन.

vishwatmaklokswamivarta