vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड मधून बातमी- रायगडमधील तरुणाची देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट, गुन्हा दाखल

 रायगड मधून बातमी- रायगडमधील तरुणाची देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट, गुन्हा दाखल

राज्य प्रतिनिधी-काश्मीरमधील  पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 भारतीय नागरीकांनी जीव गमावलाय. दरम्यान, भारतीय पर्यटक मृत्यूमुखी पडल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना भारत सरकारने मोठा निर्णय घेतला. भारतीय लष्कराने पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूरला  सुरुवात केली आणि त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाला सुरुवात झालीये. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल 

भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असताना रायगडमधील  एका तरुणाने देशविरोधी पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रायगडच्या  पेणमधील एका तरुणाने देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर त्याच्याविरोधात पेण शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी त्याच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची पेण पोलिसांनी दखल घेतली असून त्याच्यावर भा. न्या. स. कलम 353,1 ख व 353 ( 2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी पुढील तपास सुरु केलाय.

सर्वधर्मीयांकडून देशविरोधी पोस्ट करणाऱ्या तरुणाचा निषेध ,तरुणाने आपल्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवरून देशाविरुद्ध चिथावणीखोर विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे पेण मधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी याचा जोरदार निषेध केला आहे. पेण नगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तानचे बॅनर पायाखाली तुडवून नीम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा घोषणा देत ही निषेध रॅली काढण्यात  आली. यावेळी असंख्य नागरिक या निषेध रॅलीत सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत.दरम्यान, रायगडपूर्वी  पुण्यातील एका तरुणाने देखील देशविरोधी पोस्ट केली होती. पुण्यात वास्तवात असलेल्या तरुणीने पाकिस्तानच्य समर्थनार्थ पोस्ट केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी या तरुणीला अटक केली असून तिच्या कॉलेजनेही तिच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

0000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार नवी दिल्लीतील जागतिक परिषदेमध्ये ऊर्जा प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ५० गावे आणि शंभर अंगणवाड्या स्मार्ट इंटेजिलंट व्हाव्यात – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी

vishwatmaklokswamivarta

ॲग्रीस्टॅक नोंदणी, शून्य प्रलंबितता कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी स्वामी

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.