
रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र” करिता जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांनी नोंदणी करावी
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत जिल्ह्यात दि.29 सप्टेंबर,2026 रोजी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र”चे आयोजन करण्यात येत असून याकरिता रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करुन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त श्रीकांत पां.कोकाटे यांनी केले आहे.
दि.29 सप्टेंबर, 2026 रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी 500 ठिकाणी रोजगार मेळावे/प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करुन राज्याच्या रोजगार क्षेत्रात एक नवा अध्याय लिहला जाणार आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, हा या उपक्रमांचा मूळ गाभा असून हा उपक्रम राज्यातील जिल्हा, तालुका व औद्योगिक परिसरांमध्ये राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील विविध रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी ,आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मसी पदवीधर व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्या कडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हते प्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. तसेच https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिकंद्वारे सुध्दा माहिती भरण्यात यावी. “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” मध्ये नवउद्योजकांकरिता महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली जाईल. तसेच जिल्ह्यातील कार्यरत महामंडळ “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” मध्ये आपल्या विविध कर्ज योजनासह सहभागी होत आहेत. आपल्याला कर्ज योजनेबद्दल माहिती व मार्गदर्शन याद्वारे दिले जाईल. जेणे करून स्वयंरोजगार करणाऱ्या इच्छूक उमेदवारांना योजनेचा लाभ मिळू शकेल. जिल्ह्यात राबविले जाणारे मोफत कौशल्य प्रशिक्षणाची माहिती व मार्गदर्शन रोजगार मेळाव्यामध्ये केले जाणार आहे. तसेच “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” मधील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 व या कार्यालयाचे कनिष्ठ कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी, श्री. राहुल वि.गुल्हाणे, 7020758701 लिपिक टंकलेखक श्री.म.भा.वखरे, 9421613757 या यांच्या भ्रमध्वनी वर संपर्क साधावा.कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनरोजगार महाकुंभ- महाराष्ट्रराज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरीइच्छुक उमेदवारांनी भरावयाचा नोंदणी अर्ज (Job Seeker Registration Form)रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नोकरीइच्छुक युवक-युवतींनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती अचूकपणे भरावी. https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7
0000000



