vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना जिल्ह्यातील 25 हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसाठी तिसरी यादी जाहीर**जिल्ह्यातील 862 गावांतील पात्र शेतकऱ्यांचा समावेश*

*जालना जिल्ह्यातील 25 हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसाठी तिसरी यादी जाहीर**जिल्ह्यातील 862 गावांतील पात्र शेतकऱ्यांचा समावेश*

 

जालना, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत जालना जिल्ह्यातील थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी शुक्रवार (दि. ११) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यातील 862 गावातील 25 हजार 847 पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे.

अनियमित पर्जन्य, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि हवामान बदलामुळे शेती व्यवसायासमोर निर्माण झालेल्या अडचणी, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ही योजना जाहीर केली आहे.

योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रतिशेतकरी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा यामध्ये समावेश आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेल्या पात्र कर्जांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

गावपातळीवर यादी उपलब्ध,तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची नावे संबंधित गावातील गावचावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच संबंधित बँक शाखेत प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यादीतील शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन लवकरात-लवरकत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालकास कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. प्रमाणीकरणावेळी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा कर्जाची रक्कम चुकीची आढळल्यास त्याबाबत ऑनलाइन तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यासाठी सेवा केंद्र चालकास सांगावे.तसेच, आधार प्रमाणीकरण करताना बोटांचे ठसे उमटत नसल्यास त्याबाबतची ऑनलाइन तक्रार तहसीलदारांकडे करण्याची सूचना करण्यात आली आहे.मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी बँकेशी संपर्क साधावायादीतील शेतकरी मयत असल्यास त्यांच्या वारसांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि कर्जखात्यावर वारसाचे नाव नोंदवून घ्यावे. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी संबंधित शेतकऱ्यांना याबाबत माहिती द्यावी आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना श्री. विष्णू रोडगे यांनी केले आहे.

 

****

संबंधित पोस्ट

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुक स्वयंसेवकांना आवाहन

माळशेज घाटात सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्त्वावर स्कायवॉक उभारण्यासाठी एक महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महत्वकांक्षी योजना.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

जागतिक युवा कौशल्य विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

चंद्रपुरातील नवरगावच्या मथुरा ताई प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची संवेदनशील दखल “ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” – डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta