धारावी मुकुंद नगर येथे पाटील परिवाराचा मानाचा गणपती घरगुती गणपती चला दर्शनाला
मुंबई प्रतिनिधी-
देशासह राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाच्या उत्सवाची धूम सुरू आहे त्यातच लहान गणपती मोठे गणपती मानाचे गणपती घरगुती गणपती यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे
आज महागणपती सोहळ्याचे सामाजिक संस्थांनी स्वागत केले आहे त्यात धारावी विभागातील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गणपती मंडळांना आणि छोट्या छोट्या गणपती धारकांना आरती संग्रह मोफत देण्यात आले
दरम्यान धारावी विभागातील प्रसिद्ध समाजसेविका शोभाताई प्रवीण पाटील- प्रवीण रामभाऊ पाटील यांच्या परिवाराने ही मानाचे गणपतीचा पहिल्यांदाच सहभाग दर्शविला आहे त्यांनी या वर्षी गणपती बाप्पाची सुरुवात केली आहे प्रथम वर्षी घरगुती गणपती म्हणून दीड दिवसाचा मानाचे गणपती आपल्या स्व गृही गणपती बाप्पाला विराजमान केले आहे पहिल्यांदा सुरुवात असल्याने मनोभावे सेवा करून गणपती बाप्पाचे आशीर्वाद सर्व परिवारांना लाभावे तसेच सर्वांचे मनातील मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच सर्वांना ही गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो याकरता पाटील परिवारांनी दीड दिवसाच्या गणपतीपासून मानाचे गणपती ला स्थान देऊन सुरुवात केली आहे तर चला दर्शनाला
प्रसिद्ध समाजसेविका शोभाताई पाटील यांच्या धारावी मुकुंद नगर येथील डांबर कंपनी मोरेश्वर सोसायटी समोर श्रीराम बिल्डिंग ए विंग येथे गणपती बाप्पाची स्थापना केली असून सर्वांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि महाप्रसाद घेण्यासाठी आमंत्रणही दिले आहे