
बौद्ध विहार तथा बौद्ध स्मशानभूमी याची तात्काळ नोंद व्हावी या मागणी
चिखली : प्रतिनिधी- तालुक्यातील वळती येथील बौद्ध विहार तथा बौद्ध स्मशानभूमी याची तात्काळ नोंद व्हावी या मागणीसाठी गेल्या तीन चार वर्षांपासून जिल्हा परिषद मुख्य कार्यपालना अधिकारी तथा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत चे सरपंच ग्रामसेवक यांच्याशी पत्रव्यवहार करून व सामाजिक नेत्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु ही मागणी नेहमी करता हेतूपूरस्पर दुर्लक्षित केल्यामुळे शेवटी आज दिनांक १५ सप्टेंबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेबीताई हिवाळे व आरपीआयचे कार्यकर्ते व वळती येथील बौद्ध समाज सर्वजण मिळून या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. या मागणीची तीव्रता लक्षात न घेता मंत्रालयातून पत्र व्यवहार येऊन देखील वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत हि अत्यंत चिंतेची व बेकायदेशीर बाब आहे सरपंच पती व स्वतः ग्रामसेवक या मागणीच्या बाबतीमध्ये आणि तुपाची व बेकायदेशीर भूमिका बजावत आहेत त्यामुळे सर्वत्र त्यांच्या विषयी नाराजीचे संतापाचे वातावर निर्माण झाले असून हा प्रश्न केवळ वळती येथील बौद्ध समाजात नसून चिखली तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाचा आहे अशी चर्चा होऊन सर्व समाज या ठिकाणी एकत्र येत आहे व अन्य आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही त्यामुळे आता या बाबतीमध्ये तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना तात्काळ निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली आहे.
या उपोषण मंडपाला प्रशांत डोंगरदिवे, विजयकांत गवई, सलीम भाई, अमोल लहाने, राजू झिने, यांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला. तसेच यावेळी बेबी बाई हिवाळे, रिपाई नेते भाई संजय वाकोडे, भीमराव हिवाळे, शरद हिवाळे, कचरू हिवाळे, शेषराव हिवाळे, सागर हिवाळे, अमोल हिवाळे, संजय हिवाळे, अशोक जाधव, मनोज हिवाळे, प्रकाश हिवाळे, लक्ष्मी धनराज, कचरा बाई खरात, अनिता हिवाळे, शिला बाई हिवाळे, सिंधू बाई पवार, मंदा हिवाळे, लिंबाजी गवई, सुनंदा हिवाळे, पप्पू हिवाळे, मनोहर खरात यांच्यासह वळती येथील समस्त बौद्ध समाज बांधव उपस्थित आहे.



