सेवा संकल्प अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
सातारा, प्रतिनिधी :- महाराष्ट्र सरकारच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत कराड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक कामकाजाच्या धावपळीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ही तपासणी मोहीम राबवण्यात आली
या आरोग्य शिबिरादरम्यान कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आणि तहसीलदार कल्पना ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरोग्य तपासणी शुभारंभ करण्यात आला. यानंतर प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह यांसह इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे करण्यात आल्या