vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम संपन्न

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम संपन्न

 

रायगड-अलिबाग प्रतिनिधी) :- जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनारा येथे आयोजित मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमादरम्यान क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान देणाऱ्या ‘निक्षय मित्र’ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हयात विविध ठिकाणी टी बी डे साजरा करण्यात आला व त्यानिमित्ताने क्षयरुग्णांना पोषण आहार किट (फूड बास्केट) देखील वितरित करण्यात आले.

कार्यक्रमास उपाध्यक्ष मधुकर पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री संजना काळे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, सभापती तथा गटनेते वैकुंठ पाटील, नारायण डामसे, रसिका केणी, जि. प. सदस्या मानसी दळवी, जि. प. सदस्य अमित नाईक, जनार्दन भस्मा, प्रभाकर म्हात्रे, संतोष बैलमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथून रॅली काढून, पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली.तसेच सर्वांना टी बी मुक्त ग्रामपंचायत ची शपथ देण्यात आली.

००००००००

संबंधित पोस्ट

इटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विशेष मुलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही’- डॉ. सुधा कांकरिया लिंगगुणोत्तर कमी असलेल्या १६ गावांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न.

ठाणे जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान२०४७ पर्यंत सिकलसेल मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त….रक्त देऊ या..आशा जागवू या- एकत्रितपणे जीव वाचवू या…।

वैद्यकीय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत नवे बदल आवश्यक पल्स 2026 मधील चर्चासत्रात भर

महाआरोग्य शिबिर- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२५-

vishwatmaklokswamivarta