vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये – राज्य मंडळाच्या सूचना

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये – राज्य मंडळाच्या सूचना

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.

मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना देण्यास सांगितले आहे. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

00000

 

संबंधित पोस्ट

आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड, अहिल्यानगर येथे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

बुलडाणा अर्बनची यशोगाथा आता विशेष टपाल आवरणावर…

उझबेकिस्तानच्या दौऱ्यात पंतप्रधानांची उझबेकिस्तानच्या अध्यक्षांशी औपचारिक चर्चा

दिल्लीतमहिलासाहित्यसंमेलन ; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल ..

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

vishwatmaklokswamivarta