vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या जीवाला धोका, केंद्रानं दिली झेड प्लस सुरक्षा.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या जीवाला धोका, केंद्रानं दिली झेड प्लस सुरक्षा,

मुंबई – प्रतिनिधी  एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राज्याचे कॅबिनेटमंत्री नवाब मलिकांना यांनी थेट जाहीर सभेतून समीर वानखेडे लवकरच तुरुंगात जातील, असे म्हटले. त्यानंतर, वानखेडे आणि मलिक यांच्यातील शाब्दीक संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यातच, वानखेडे कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे म्हटले होते. तर, समीर वानखेडे यांच्या जीवाला धोका असल्याचेही सांगण्यात येत. त्यामुळे, केंद्रीय गृहमंत्रालयाने समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

समीर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. मुंबईत कॉर्टेलिया क्रूजवर २ ऑक्टोबर रोजी त्यांनी केलेल्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यापासून NCB च्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकयांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. क्रुझवर उपस्थित असणाऱ्या बड्या ड्रग्ज माफियाला समीर वानखेडे यांनी सोडून दिलं असा दावा मलिकांनी केला आहे. मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे, वानखेडे कुटुंबीयही मैदानात उतरले असून पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना इशाराच दिला आहे.

क्रांती रेडकरही संतापल्या

मलिकांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर( यांनी जात प्रमाणपत्रावरुनही स्पष्टीकरण दिलंय. जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावं. मंत्री नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे. हिंदू महार असल्याचं प्रमाणपत्र सासऱ्यांनी सगळ्यांना दाखवलं आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते कोर्टात सिद्ध करावे. जितक्या खालच्या दर्जाला जात आहे, त्याने असंच वाटतं मंत्रिपदाचं त्यांना काही देणंघेणं नाही, असेही तिने म्हटलं

संबंधित पोस्ट

भारत पाकिस्तान युद्ध तणाव: ‘पाकिस्तानने 36 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा केला प्रयत्न- कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती

नवी मुंबईतील खळबळजनक वृत्त निवारागृहात तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी चर्चच्या मुख्य धर्मोपदेशकाला अटक..

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाचे ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर..

मुंबईत मुसळधार पावसामुळे तुळशी तलाव  भरभरून वाहू लागला…

शालेय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेसाठी11 जुलै पर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार